अभिनेते नाना पेटकर कायम चाहत्यांमध्ये त्यांच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यांना आज देखील मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनिषा कोईराला यांच्या नात्याबद्दल आज अनेकांना माहिती आहे. 1996 साली प्रदर्शित झालेल्या ‘अग्निसाक्षी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान नाना पाटेकर आणि मनिषा यांच्यामध्ये प्रेम बहरलं.
मनिषा आणि नाना पाटेकर यांच्या वयात देखील मोठं अंतर होतं. मनिषा, नाना पाटेकर यांच्यापेक्षा जवळपास 20 वर्ष लहान होती. पण तेव्हा नाना पाटेकर विवाहित होते. पण तेव्हा नाना पाटेकर त्यांच्या पत्नीसोबत राहात नव्हते. पत्नीपासून वेगळं राहात असताना देखील नाना पाटेकर घटस्फोटासाठी तयार नव्हते. पत्नीला घटस्फोट देऊन नाना पाटेकर मनिषा हिच्यासोबत लग्नासाठी तयार नव्हते, असं देखील सांगण्यात येत.
एवढंच नाहीतर, नाना पाटेकर मनिषा हिच्यासाठी प्रचंड पझेसिव्ह होते. मनिषा हिने त्यांच्या आवडीचे कपडे घातले नाहीत म्हणून देखील दोघांमध्ये भांडणं व्हायची. मनिषा हिने सिनेमात को-स्टारसोबत क्लोज सीन शूट केल्यानंतर नाना पाटेकर त्याचा विरोध करायचे. यामुळे दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची… असा देखील दावा रिपोर्ट्सच्या माध्यमातून करण्यात आला.
मीडिया रिपोर्टनुसार, मनिषा कोईराला हिने नाना पाटेकर यांना अभिनेत्री आयेशा जुल्का हिच्यासोबत बंद खोलीत पाहिलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यासोबत असलेलं नातं संपवलं. मनिषा हिच्यासोबच ब्रेकअप झाल्यानंतर नाना पाटेकर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. जे आजही चर्चेत आहे.
नाना पटेकर म्हणाले होते, ‘मनिषा फार संवेदनशील अभिनेत्री आहे. तिला कोणासोबत जुळवून घेण्याची गरज नाही… हे तिने समजून घेतलं पाहिजे. तिच्याकडे जे काही आहे, ते गरजेपेक्षा अधिक आहे. ती आता सध्या स्वतःसोबत काय करत आहे… हे पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी येतं… तिच्याबद्दल बोलण्यासाठी आज माझ्याकडे काहीही नाही…’
‘ब्रेकअप आयुष्यातील फार कठीण टप्पा आहे. ब्रेकअपचा सामना करणं फार कठीण आहे. ज्याने ब्रेकअपचं दुःख सोसलं आहे. त्यालाच या भावना कळतील…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले होते. नाना पाटेकर यांच्या शिवाय अनेक सेलिब्रिटींना मनिषा हिने डेट केलं आहे आहे. पण कोणासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
अखेर अभिनेत्रीने उद्योजक सम्राट दलाल याच्यासोबत देखील लग्न केलं. पण दोन वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा लग्न करण्याचा विचार केला नाही. आज मनिषा हिच्याकडे संपत्ती, पैसा सर्वकाही आहे. पण वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्रीने एकटीच आहे.