Nana Patrkar Son: आज दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना कोणत्या ओळखीची गरज नाही. नाना पाटेकर यांनी अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांना अनेकवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नानांच्या नावावर पद्मश्री पुरस्कार देखील आहे. नाना पाटेकर यांचं अभिनय, त्यांचे डायलॉग बोलण्याची शैली इत्यादी गोष्टींमुळे नाना पाटेकर चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. म्हणून प्रत्येक वयोगटातील व्यक्ती नाना पाटेकर यांचा चाहता आहे.
सांगायचं झालं तर, नाना पाटेकर कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. नाना पाटेकर यांनी अभिनेत्री आणि बँक ऑफिसर निलाकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. नाना पाटेकर यांच्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर असं आहे.
मल्हार पाटेकर वडिलांसारखा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता नसला तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील मल्हार याचा एका फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर कळतं की मल्हार देखील वडिलांप्रमाणे साधं आयुष्य जगतो.
मल्हार पाटेकर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, कॉमर्समध्ये पदवी मिळवल्यानंतर मल्हार याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. मल्हार पाटेकर, दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होतो. पण तेव्हाच प्रकाश झा आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये वाद झाले आणि प्रकाश झा यांनी मल्हार याला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला.
‘द अटॅक ऑफ 26\11 ‘ सिनेमात मल्हार याने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आता मल्हार याचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे. नाना पाटेकर यांच्या नावाने मल्हार याने प्रॉडक्शन हाउस सुरु केलं आहे. मल्हार याचं राहणीमान साधं असलं तरी, तो गुडलुकिंग आहे.