‘क्रांतीवीर’, ‘नटसम्राट’, ‘परिंदा’, ‘वजूद’, ‘टॅक्सी नं. 9 2 11’, ‘वेलकम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेते नाना पाटेकर यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजची चाहते नाना पाटेकर यांचे सिनेमे आवडीने आणि उत्साहाने पाहात असतात. नाना पाटेकर यांचा अभिनय, त्यांचे डायलॉग बोलण्याची शैली इत्यादी गोष्टींमुळे नाना पाटेकर चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. म्हणून प्रत्येक वयोगटातील व्यक्ती नाना पाटेकर यांचा चाहता आहे. झगमगत्या विश्वात आजपर्यंत कोणीही नाना पाटेकर यांची जागा घेऊ शकलेला नाही.
नाना पाटेकर यांनी फक्त मराठी सिनेविश्वातच नाहीतर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. आज त्यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण आता नाना पाटेकर यांची नाहीतर, त्यांच्या मुलाची चर्चा रंगली आहे. नाना पाटेकर यांच्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर असं आहे.
नाना पाटेकर यांचा मुलगा असला तरी मल्हार पाटेकर लाईमलाईटपासून दूर अत्यंत साधं आयुष्य जगतो. मल्हार याच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, मुंबईच्या सरस्वती मंदिर हायस्कूलमधून मल्हार याने शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मल्हार याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे. मल्हारला लहानपणापासूनच सिनेमांमध्ये काम करण्याची आवड होती. पण त्याचं अभिनेता व्हायचं स्वप्न पूर्ण झालं नाही.
रिपोर्टनुसार, दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सिनेमाच्या माध्यमातून मल्हार सिनेविश्वात पदार्पण करणार होता. पण नाना पाटेकर आणि प्रकाश यांच्यात काही वाद असल्यामुळे नाना यांनी मल्हार याला सिनेमात काम करण्यास नकार दिला.
वडिलांनी प्रकाश झा यांच्या सिनेमात काम करण्यास नकार दिल्यानंतर मल्हार याने राम गोपाल वर्मा यांच्या ‘द अटॅक ऑफ 26\11’ सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मल्हार पाटेकर याचं स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. मल्हार पाटेकर याने वडिलांच्या नावाने प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं आहे.
मल्हार पाटेकर याच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस असं आहे. मल्हार याचं राहणीमान साधं असलं तरी, तो गुडलुकिंग आहे. सोशल मीडियावर नाना पाटेकर आणि मल्हार पाटेकर यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. मल्हार पाटेकर लाईमलाईट आणि सोशल मीडियापासून देखील दूर असतो.