मैं कितना घिनौना आदमी था…, मोठ्या मुलाच्या निधनावर नाना पाटेकर यांनी सोडलं मौन

| Updated on: Jun 22, 2024 | 8:15 AM

Nana Patekar : अडीच वर्षांचा असताना नाना पाटेकर यांच्या मोठ्या मुलाने घेतला होता अखेरचा श्वास, मुलाच्या निधनावर अनेक वर्षांनंतर नाना यांनी सोडलं मौन; म्हणाले, 'मैं कितना घिनौना आदमी था...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर यांची चर्चा...

मैं कितना घिनौना आदमी था..., मोठ्या मुलाच्या निधनावर नाना पाटेकर यांनी सोडलं मौन
नाना पाटेकर
Follow us on

‘क्रांतीवीर’, ‘नटसम्राट’, ‘परिंदा’, ‘वजूद’, ‘टॅक्सी नं. 9 2 11’, ‘वेलकम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही नाना पाटेकर यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने आणि उत्साहाने पाहातात. सांगायचं झालं तर नाना पाटेकर कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत राहिले. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी मोठा मुलगा आणि त्याच्या निधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाहीतर, अनेक गोष्टी नाना पाटेकर यांनी चाहत्यांना सांगितल्या…

मोठ्या मुलाच्या निधनावर नाना पाटेकर म्हणाले, ‘मझा मोठा मुलगा जन्मतः आजारी होता. त्याला आरोग्यासंबंधी काही समस्या होत्या. त्याच्या एका डोळ्यात काही समस्या होत्या. त्याला स्वतःच्या डोळ्यांना पाहता येत नव्हतं. मी इतका वाईट व्यक्ती आहे की, मुलाला पाहिल्यानंतर मी विचार केला लोकं काय म्हणतील नानाचा मुलगा कसा आहे..’

‘मुलाबद्दल मला काय वाटत आहे… याचा मी तेव्हा विचार केलाच नाही. माझ्या मुलाबद्दल लोकं काय म्हणतील हाच विचार मी केला. दुर्वास नाव होतं त्याचं. अडीच वर्षांचा असताना त्याचं निधन झालं. काही गोष्टी घडायच्या असतात, त्या घडतात…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.

एवढंच नाहीतर, पत्नी नीलकांती यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीबद्दल देखील नाना पाटेकर म्हणाले, ‘एका नाटकाच्या दरम्यान आमची ओळख झाली होती. तेव्हा नीलकांती बँकमध्ये काम करत होत्या आणि त्यांना अडीच हजार वेतन मिळायचं. नीलकांती यांनी मला सांगितलं होती, नाटक करायचं असेल तर करा… बाकी पैसे येत राहतील…’

शिवाय नाना पटेकर यांनी सिगारेट सोडण्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘मी माझ्या बहिणीमुळे सिगारेट ओढणं बंद केलं. बहिणीच्या मुलाचं निधन झालं होतं. तेव्हा दिवसाला मी 60 सिगारेट प्यायचो. अंघोळ करताना देखील मला सिगारेट लागत होती. माझ्या कारमध्ये देखील कोणी बसायचं नाही. कारण खूप घाण वास यायचा…’

‘मी कधी दारू एवढी प्यायलो नाही, जेवढी सिगारेट… ज्यामुळे मला सतत खोकला देखील यायचा. म्हणून बहीण म्हणाली आणखी काय काय पाहायला लागणार आहे माहिती नाही… तिचे शब्द माझ्या मनाला लागले आणि त्यानंतर मी कधी सिगारेटला हात देखील लावला नाही…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.