हार्दिक पांड्या घटस्फोटासाठी आधीच होता तयार? म्हणाला, ‘माझा काहीही भरोसा नाही म्हणून..’

| Updated on: May 27, 2024 | 9:04 AM

Natasa Stankovic - Hardik Pandya : 'माझा काहीही भरोसा नाही म्हणून..', हार्दिक पांड्या याने संपत्ती वाचवण्यासाठी पूर्वीच केली मोठी योजना, पत्नी नताशा हिला मिळणार नाही एकही रुपया? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

हार्दिक पांड्या घटस्फोटासाठी आधीच होता तयार? म्हणाला, माझा काहीही भरोसा नाही म्हणून..
Follow us on

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्याच्या आयुष्यातील कठीण दिवस सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. हार्दिक याच्या खासगी आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून नताशा – हार्दिक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दोघांमधील वाद इतके टोकाला पोहोचले की, दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. नुकताच, हार्दिक पांड्या याला आयपीएलमधून बाहेर पडल्याचा धक्का सहन करावा लागला. पण आता रिपोर्ट्सनुसार, हार्दिक खासगी आयुष्यात आणखी एका कठीण टप्प्यावर उभा आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा क्रिकेटरला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. नताशा फक्त घटस्फोटाच्या तयारीत नाहीतर, तिने हार्दिक यांच्या 70 टक्के संपत्तीवर स्वतःचा हक्क असल्याचा दावा केला आहे. यावर अद्याप कोणी अधिकृत घोषणा केलेली नाही. पण जर असं झालं तर, हार्दिक याच्यासाठी मोठा झटका असणार नाही.

 

 

हार्दिक याच्याकडे तब्बल 91 कोटी रुपयांची संपत्ती आहे. जर त्यातील 70 टक्के नताशा हिला द्यावे लागले तर, अभिनेत्रीला 63 कोटी द्यावे लागतील… अशी माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत हार्दिक याने मोठा खुलासा केला होता. ‘माझ्या नावावर कोणतीच संपत्ती नाही. मी सर्वकाही माझ्या आईच्या नावावर केलं आहे…’

सांगायचं झालं तर, हार्दिक याचा निर्णय नताशा हिच्यासाठी निराशाजनक ठरू शकतो. पुढे हार्दिक म्हणाला होता, ‘मी सर्वकाही माझ्या आईच्या नावावर केलं आहे. माझ्या कार देखील आईच्या नावावर आहेत. माझा काहीही भरोसा नाही. त्यामुळे मी स्वतःच्या नावावर काहीही करणार नाही. पुढे जाऊन 50 टक्के मला कोणाला द्यायचे नाहीत… ‘ असं देखील हार्दिक म्हणाला होता.

 

 

हार्दिक याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, क्रिकेटरकडे 91 कोटी रुपयांची संपत्ती आहे. हार्दिक याच्याकडे मुंबईत 30 कोटी रुपयांचा आलिशान घर आहे. शिवाय वडोदरा याठिकाणी देखील हार्दिक याचा एक बंगला आहे. हार्दिक याच्या गॅरेजमध्ये देखील महागड्या गाड्या आहेत. हार्दिक याच्याकडे एकूण आठ गाड्या आहेत.