भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी नताशा स्टँकोव्हिच हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे हार्दिक चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. नताशा हिने इन्स्टाग्रामवरून ‘पांड्या’ हे नाव काढल्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता रंगणाऱ्या चर्चांवर खुद्द नताशा हिने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या नताशा हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नताशा हिच्यासोबत एक मिस्ट्री मॅन देखील दिसत आहे. घटस्फोटाच्या चर्चा रंगल्यानंतर नताशा हिला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं. यावेळी नताशा हिला हार्दिक पांड्यासोबत रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल देखील विचारण्यात आलं. पण नताशा हिने काहीही बोलणं टाळलं. नताशा फक्त ‘थँक्यू सो मच’ हे दोन शब्द म्हणाली आणि त्या मिस्ट्री मॅनसोबत निघून गेली.
घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या नशाता हिच्यासोबत दिसलेला मिस्ट्री मॅन कोण? याची देखील सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा – हार्दिक यांच्या नात्याबद्दल बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, घटस्फोट झाल्यास हार्दिक यांच्या संपत्तीमध्ये 70 टक्के हिस्सा नताशा हिचा असेल असा दावा करण्यात येत आहे.
पण पूर्वीच हार्दिक याने स्वतःचे संपत्ती आईच्या नावावर केली आहे. हार्दिक याच्याकडे तब्बल 91 कोटी रुपयांची संपत्ती आहे. जर त्यातील 70 टक्के नताशा हिला द्यावे लागले तर, अभिनेत्रीला 63 कोटी द्यावे लागतील… अशी माहिती देखील समोर येत आहे.
दरम्यान, हार्दिक याची एक मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हार्दिक म्हणाला होता, ‘मी सर्वकाही माझ्या आईच्या नावावर केलं आहे. माझ्या कार देखील आईच्या नावावर आहेत. मी स्वतःच्या नावावर काहीही करणार नाही. पुढे जाऊन 50 टक्के मला कोणाला द्यायचे नाहीत… ‘
हार्दिक पांड्या – नताशा स्टँकोव्हिच यांना 2020 मध्ये साध्या पद्धतीत लग्न करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. लग्नाच्या काही महिन्यांनंतर नताशा हिने मुलगा अगस्त्य याला जन्म दिला. पांड्या कुटुंब चाहत्यांना देखील आवडत होतं. त्यानंतर 2023 मध्ये हार्दिक – नताशा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.