भारतीय क्रिकेट टी 20 वर्ल्ड कप टीमचा उप-कर्णधार हार्दिक पांड्या अशा क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्याच्या फक्त प्रोफेशनल नाहीतर, खासगी आयुष्याची देखील चर्चा रंगलेली असते. हार्दिक कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक याच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. हार्दिक याची पत्नी आणि नाताना स्टेनकोविक हिने सोशल मीडियावर पतीचं नाव काढलं होतं. त्यामुळे हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला.
हार्दिक याच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना पहिल्यांदा नताशा हिने एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये नताशा एकटी दिसत आहे. सध्या सर्वत्र नताशा हिच्या फोटोची चर्चा रंगलेली आहे. फोटोमध्ये नताशा हिने डोळ्यांखाली आय मास्क लावला आहे. फोटोमध्ये नताशा स्वतःची काळजी घेताना दिसत आहे. सध्या नताशा हिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं.
सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. पण दोघांनी देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. आयपीएल सामन्यांदरम्यान कायम पतीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर असणारी नताशा यंदा दिसली नाही. त्यामुळे देखील घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. चाहत्यांमध्ये देखील हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
नताशा आणि हार्दिक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, जानेवारी 2020 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर मे 2020 नताशा – हार्दिक यांनी कोर्ट मॅरिज केलं. त्यानंतर नताशा हिने मुलाला जन्म दिला. नताशा – हार्दिक यांच्या मुलाचं नाव अगस्त्य असं आहे. तिघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. सोशल मीडियावर देखील पांड्या कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
नताशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण लग्नानंतर अभिनेत्रीने अभिनयाला राम राम ठोकला. नताशा तिचा पूर्णवेळ कुटुंबाला दिला आहे. आता अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, नताशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नताशा मुलासोबत देखील फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते.