भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त हार्दिक – नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 2020 मध्ये नताशा – हार्दिक यांनी गुपचूप लग्न केलं. लॉकडाऊन काळात दोघांनी घरीच लग्न केलं होतं. लग्नाच्या काही महिन्यात दोघांनी मुलगा अगस्त्य याचं जगात स्वागत केलं.
नताशा – हार्दिक यांनी गुपचूप लग्न केल्यानंतर अभिनेत्रीचे आई-वडील जावयाला दोन वर्षांनंतर भेटले. आई – वडील आणि हार्दिक यांच्या पहिल्या भेटीचा नताशा हिने व्लॉग तयार केला होता. नताशा हिने व्लॉग तिच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला होता.
नशाता हिची आई Rada आणि वडील Goksi दोघे देखील हार्दिक याला भेटल्यानंतर आनंदी होते. त्यामध्ये कोणती भांडणं देखील नव्हती. पहिल्या भेटीत नताशा हिच्या आई म्हणाल्या होत्या, ‘मला माहिती होतं, हार्दिक मला भेटायला नक्की येईल.’ महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडीओ हार्दिक याने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
व्हिडीओ पोस्ट क्रिकेटरने कॅप्शनमध्ये, ‘पहिली भेटीपर्यंत… नताशा हिचं कुटुंब आता माझं देखील कुटुंब आहे. या क्षणांसाठी मी आभारी आहे. त्यांना भेटून फार छान वाटलं.’ सर्व काही चांगलं असताना नताशा – हार्दिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा का रंगत आहेत? असा प्रश्न चाहत्यांना देखील पडला आहे.
सांगायचं झालं तर, 2020 मध्ये गुपचूप लग्न केल्यानंतर हार्दिक आणि नताशा यांनी 2023 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नात कुटुंबिय, मित्र-परिवार आणि त्यांचा मुलगा देखील सामिल होता. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सध्या सर्वत्र फक्त नकाशा – हार्दिक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
नताशा हिच्याबद्दल सांगायचं झालंतर, तिने मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. मॉडेल म्हणून अभिनेत्रीने करियरची सुरुवात केली. लग्नानंतर अभिनेत्री अभिनयापासून दूर होती. पण सोशल मीडियावर नताशा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.