नवी दिल्ली : 18 ऑक्टोबर 2023 | 69 वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी पार पडला. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आलं. यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. हा सन्मान स्वीकारण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर तिथे पोहोचला होता. मंचावर जाऊन राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेतानाचा करणचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला. मात्र या व्हिडीओतील एका गोष्टीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं. करण मंचावर असताना ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
या व्हायरल व्हिडीओमध्ये करण जेव्हा मंचावर पोहोचतो, तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेले विवेक अग्निहोत्री त्याच्याकडे पाहून डोळे मोठे करतात. त्यांची ही प्रतिक्रिया नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतेय. त्यावरून काही भन्नाट मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत. विवेक अग्निहोत्री यांना त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी नरगिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यासाठी ते तिथे उपस्थित होते.
विवेक अग्निहोत्री आणि करण जोहर यांच्यात शीतयुद्ध आहे. अनेकदा विवेक करणच्या चित्रपटांवर टिप्पणी करताना दिसून येतात. “करण जोहरने चित्रपटांच्या संस्कृतीला खराब केलं आहे. करण आणि शाहरुखच्या चित्रपटांमुळे भारतीय संस्कृतीचं नुकसान होत आहे. चित्रपटांमध्ये खरी कथा दाखवणं खूप गरजेचं आहे”, अशा शब्दांत अग्निहोत्रींनी एका मुलाखतीत करणवर निशाणा साधला होता.
President Droupadi Murmu presents the Special Jury Award to producer Karan Johar for the film Shershaah at the 69th National Film Awards 🏆🎥@nfdcindia @official_dff @MIB_India #NFAonDD #NationalFilmAwards #NFA #NFDC #KaranJohar pic.twitter.com/IsUFmNSZJS
— DD News (@DDNewslive) October 17, 2023
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी – द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – RRR
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – रॉकट्री: द नंबी इफेक्ट
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट संपादन – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट छायांकन – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), क्रिती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)