हे स्वप्न खरं कधी होणार?; एजे-लीलाचा रोमान्स पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न

| Updated on: Dec 08, 2024 | 10:50 AM

'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यात राकेश बापट हा एजे आणि वल्लरी विराज ही लीलाची भूमिका साकारतेय. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडतेय.

हे स्वप्न खरं कधी होणार?; एजे-लीलाचा रोमान्स पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न
राकेश बापट, वल्लरी विराज
Image Credit source: Instagram
Follow us on

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत एजे आणि लीला यांचं नातं फुलताना दिसत आहे. लीला तिच्या माहेरी जाते, त्यामुळे एजे तिच्यासोबत विश्वजितला तिची काळजी घेण्यासाठी पाठवतो. ज्यामुळे लीला आनंदात आहे. एजेला लीलाची खूप आठवण येतेय आणि तो तिच्या काळजीत आहे. लीलाला वाटतंय एजेनं पाठवलेलं लेटर हे प्रेमपत्रच आहे. कामानिमित्त लीला आणि एजे हॉटेलमध्ये एकत्र येतात, जिथे त्यांच्या नात्यात जवळीक निर्माण होते.

एजे लीलाच्या काम कारण्याच्या पद्धतीवर खुश होतो. लीला चांगलं काम करून एजेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, कंपनीत फसवणुकीच्या अफवा पसरत आहेत. लीला घोटाळा पकडण्यासाठी ऑफिस सोडते, ज्यामुळे एजे चिंतेत आहे. फसवणुकीचा तपास सुरू असताना लीला फसवणुकीचा पर्दाफाश करते. यात मुख्य संशयित प्रमोद आणि विराज आहेत. एजे त्यांच्या या कृत्यामुळे प्रचंड संतापतो. लीला विराज आणि प्रमोदच्या बाजूने चर्चा करते.

हे सुद्धा वाचा

प्रमोद आणि विराज यांचे मत आहे की लीलाने घरी परत यायला हवं. एजे लीलाच्या कामगिरीवर प्रचंड खुश आहे. त्याने दाखवलेल्या काळजीमुळे लीलाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण होतो. प्रमोद आणि विराजच्या आग्रहावरून पुन्हा एकदा मतदान होतं आणि लीला परत जहागिरदारांच्या घरी येते. दुसरीकडे, विक्रांतला तुरुंगातून सोडण्यात येतंय आणि तो लीलाला पुन्हा खाली खेचण्याचा प्रयत्न करणार आहे. आता लीलाकडे घराच्या चाव्या आहेत, ज्यामुळे दुर्गाचा अहंकार दुखावतो. आता विक्रांतचा नवीन डाव काय असेल? अहंकार दुखावल्यामुळे दुर्गाचा नवीन प्लॅन काय असेल? एजे आणि लीलामध्ये खरंच प्रेमाचं नातं निर्माण होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तर मालिकेच्या आगामी भागात मिळतील.