‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला मोठा इतिहास, चाहत्यांचा उत्साह शिगेला

| Updated on: Sep 21, 2024 | 8:15 AM

Navra Majha Navsacha 2: 'नवरा माझा नवसाचा 2' सिनेमाचा संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला... पहिल्याच दिवशी सिनेमाने रचला मोठा इतिहास... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा...

नवरा माझा नवसाचा 2 सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला मोठा इतिहास, चाहत्यांचा उत्साह  शिगेला
Follow us on

Navra Majha Navsacha 2: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. चाहते गेल्या अनेक वर्षांपासून सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत होते. अखेर 20 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘नवरा माझा नवसाचा 2’ रिलीज झाला आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या सिनेमाला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम देखील मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठा इतिहास रचला आहे. सिनेमा पाहाण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल्ल केली आहेत.

‘नवरा माझा नवसाचा 2’ पाहण्यासाठी मुंबईसह इतर ठिकाणी देखील थिएटर हाऊसफुल्ल आहेत. 1000 हून अधिक थिएटरमध्ये नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्यापैकी 600 हून अधिक थिएटर्स हाऊसफुल्ल झाले आहेत. अशात शनिवार आणि रविवार असल्यामुळे अनेक जण सिनेमा पाहण्यासाठी थिएटर गर्दी करतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

 

 

‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमा पाहाण्यासाठी 600 हून अधिक थिएटर्स हाऊसफुल्ल आहे. मराठी सिनेमांच्या इतिहासात पहिल्यांदा मोठी कामगिरी पाहायला मिळाली आहे. सांगायचं झालं तर, सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक श्रिया पिळगांवकर हिने देखील खास पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

पहिल्याच दिवशी 1000 हून अधिक स्क्रिनपैंकी 600 हून अधिक स्क्रिन हाऊसफुल्ल ठरल्या आहेत. शिवाय नॅशनल सिनेमा डे आहे. श्रियाची पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा रंगली आहे.

तब्बल 20 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाच्या पहिल्या भागाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, वैभव मांगले, निर्मिती जाथव आणि सिद्धार्थ जाधव यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.