मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या पोस्टची चर्चा रंगली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दीपिका पादुकोण हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दीपिका पादुकोण हिने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे, असं म्हणायला देखील काही हरकत नाही. आता पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये दीपिका पोलीस अधिकाऱ्यांच्या लूकमध्ये दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्रीने आगामी सिनेमा ‘सिंघम अगेन’ सिनेमातील स्वतःच्या भूमिकेबद्दल मोठी अपडेट दिली आहे. सिनेमात दीपिका हिच्या भूमिकेचं नाव शक्ती शेट्टी असं असणार आहे. दीपिका हिने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे नुकताच कॉफी विथ करण या शोमध्ये पोहचले. या शोचा एक प्रोमो व्हायरल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी करण जोहर हा रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांना बेबी प्लॅनिंगबद्दल विचारताना दिसतोय.
पहिल्यांदाच यावर जाहिरपणे भाष्य करताना रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे दिसले आहेत. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी थेट खुलासा करत म्हटलं की, लवकरच आम्ही बेबी प्लॅनिंग करू शकतो. यांचे हे बोलणे ऐकून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. त्यामुळे दोघे कधी आनंदाची बातमा जाहिर करतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. दोघे देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींपैंकी एक आहे. सोशल मीडियावर देखील दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रणवीर आणि दीपिका सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.