अमिताभ बच्चन आणि अभिषेक येणार एकत्र? नव्याने केला मोठा खुलासा, म्हणाली, एक दिवस..

| Updated on: Feb 27, 2024 | 1:38 PM

बच्चन कुटुंब कायमच चर्चेत असतं. अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही चांगले सक्रिय दिसतात. सतत चाहत्यांसाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना ते दिसतात. नुकताच आता नव्याने मोठा खुलासा केलाय.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक येणार एकत्र? नव्याने केला मोठा खुलासा, म्हणाली, एक दिवस..
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांची नात अर्थात नव्या नवेली नंदा ही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच नव्या हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये नव्या नवेली नंदा हिने स्पष्ट केले की, तिला अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यामध्ये फार काही रस नाहीये. अनेकदा नव्या नवेली नंदा ही बाॅलिवूड पार्ट्यांना देखील उपस्थित असते. नव्या नवेली नंदा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोशल मीडियावर नव्या नवेली नंदा ही चांगलीच सक्रिय देखील दिसते. सध्या नव्या तिच्या शोमुळे चर्चेत आहे.

नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच तिची आई श्वेता बच्चन, आजी जया बच्चन आणि भाऊ अगस्त्य नंदा हे पोहचले. यावेळी अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली. यावेळी अगस्त्य नंदा हा थेट डिप्रेशनबद्दल देखील बोलताना दिसला. आपण एका वाईट काळातून गेल्याचे सांगताना देखील अगस्त्य नंदा हा दिसला.

जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्यानंतर नव्याच्या शोमध्ये आजोबा अमिताभ बच्चन आणि मामा अभिषेक बच्चन हे येणार का हा प्रश्न नव्या हिला विचारण्यात आला. यावेळी मुलाखतीमध्ये नव्या नवेली नंदा हिने मोठे विधान केले. नव्या नवेली नंदा म्हणाली की, हे खरोखरच मोठे पाॅडकास्ट होईल. मला माहिती नाही की, माझा शोमध्ये त्यासाठी डिजर्व करतो की, नाही.

पुढे नव्या म्हणाली की, हा पण कदाचित एक दिवस ते स्पेशल बघण्यासारखे नक्कीच असेल. थोडक्यात काय तर नव्याने संकेत देत सांगितले की, कदाचित अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन हे एकसोबतच नव्याच्या शोमध्ये येऊ शकतात. जर असे झाले तर तो प्रेक्षकांसाठी मोठा अनुभव हा नक्कीच असणार आहे. या दिवसाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

नव्याच्या शोमधून बरेच मोठे खुलासे केले जातात. काही दिवसांपूर्वीच श्वेता बच्चन हिने सांगितले की, लहानपणी आई वडिल हे घराच्या बाहेर असताना रागात अभिषेक बच्चन याने थेट श्वेता बच्चन हिचे केस कट केले होते. यानंतर काही दिवस ही गोष्ट श्वेताने आईपासून लपवून देखील ठेवली होती. आता अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची शोमध्ये प्रेक्षक वाट पाहत आहेत.