मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) त्याच्या सिनेमांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. आता देखील एका मोठ्या कारणामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली पत्नी आलिया सिद्दीकी हिने अभिनेत्यावर अनेक आरोप केले होते. ज्यामुळे अभिनेत्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. शिवाय पत्नीसोबत असलेल्या भांडणांमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी कायद्याच्या कचाट्यात देखील आडकला. आता नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलियाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.
पती नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यापासून विभक्त झाल्यानंतर आलियाचा मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आलिया आणि तिच्यासोबत असलेल्या मिस्ट्री मॅनची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. खुद्द आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका पुरुषासोबत व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अनेक फोटो घेवून आलियाने व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शिवाय व्हिडीओवर एक रोमँटिक गाणं देखील लावलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे चाहते संतापले आहेत. शिवाय व्हिडीओमध्ये दिसणारा मिस्ट्री मॅनसोबत नक्की कोण आहे… याबबत देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली पत्नी आलिया हिला विचारलं आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर आलियाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘तू तर फार लवकर मू ऑन केलस…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुझ्यासोबत असणारा व्यक्ती आहे तरी कोण?’.. अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मी तुझ्याबद्दल चांगला विचार करत होतो. पण तू असं काही करशील वाटलं देखील नव्हतं…’
सांगायचं झालं तर आलियाने एका मिस्ट्री मॅनसोबत रोमँटिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पण कॅप्शन दिलेलं नाही. यामुळे व्हिडीओमध्ये दिसणार मिस्ट्री मॅन नक्की कोण आहे. हे कळू शकलेलं नाही. शिवाय आलियाने देखील यावर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.
मुलांच्या कस्टडीवरून नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियामध्ये वाद सुरू आहे. कोर्टात वाद सुरु असताना आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर घरगुती हिंसाचार झाला आणि तिच्या मुलांनाही वाईट वागणूक दिली जात असल्याचे आरोप केले आहेत. दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप करत आलियाने अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले.
व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर करत आलियाने अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते. या प्रकरणावर नवाजुद्दीन कधीच काही बोलला नाही. मुलांच्या योग्य संगोपनासाठी त्यांची कस्टडी हवी आहे… एवढंच अभिनेता म्हणाला. शिवाय आलिया आणि मी गेल्या अनेक दिवसांपासून विभक्त राहत आहोत असं देखील अभिनेता म्हणाला.