मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकीचा (Nawazuddin Siddiqui) चित्रपट रिलीज झालाय. मात्र, यावेळी चित्रपटामुळे नाही तर आपल्या पर्सनल लाईफमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर अनेक गंभीर आरोप (Serious charges) हे केले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर होत असलेले आरोप पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या एक्स पत्नीचा वाद थेट कोर्टात देखील पोहचलाय. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकी याने बाॅलिवूडमध्ये (Bollywood) आपले नाव करण्यासाठी खूप जास्त संघर्ष केलाय.
नवाजुद्दीन सिद्दीकी याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, बाॅलिवूडमध्ये करिअर करणे हे नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासाठी अजिबात सोपे काम नव्हते. नुकताच दिलेल्या एक मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने त्याच्या करिअच्या सुरूवातीच्या दिवसांबद्दल सांगितले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, बऱ्याच वेळा मला कॉलर पडून सेटच्या बाहेर काढले गेले आहे. ज्यावेळी मी बाॅलिवूडमध्ये अभिनय करण्यास सुरूवात केली. त्यावेळी मला पैशांची मोठी चणचण भासत होती. माझ्याकडे अजिबातच पैसे नसायचे. चित्रपटांमध्ये साईट रोलसोबतच मी मालिकांमध्ये देखील काम करत असत.
चित्रपटाच्या सेटवर मेन अभिनेते, अभिनेत्री यांच्यासाठी आणि बाकी माझ्यासारख्या साईड कलाकारासाठी जेवण यायचे. मात्र, चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांसाठी वेगळ्या जेवणाची व्यवस्था केली जात होती. मी अभिनेत्यांसाठी आलेले जेवण करण्यासाठी सर्वांच्या नजरा चुकून पोहचत असत. मात्र, मला तिथून कॉलर पडून बाहेर काढले जात होते.
असे नाही की, सर्वत्रच असे होते. बऱ्याच प्रोडक्शन हाऊसकडून सर्व कलाकारांसाठी एकच जेवण देखील मागवले जाते. सुरूवातीच्या काळात माझ्याकडे पैसे नसायचे. एक वेळचे जेवायचे देखील पैसे नसायचे. त्यावेळी मी चित्रपटातील मुख्य कलाकारांकडून 50-50 रूपये मागून खर्च भागवत होतो. बाॅलिवूडच्या सुरूवातीच्या काळात नवाजुद्दीन सिद्दीकी याने मोठा संघर्ष केला आहे. आता कोट्यावधी संपत्तींचा मालक नवाजुद्दीन सिद्दीकी हा आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर त्याच्या पत्नीने अनेक गंभीर आरोप हे केले आहेत. सोशल मीडियावर मध्यरात्री एक व्हिडीओ शेअर करत आलिया हिने दावा केला होता की, इतक्या रात्री आपल्याला घराच्या बाहेर मुलांसोबत काढण्यात आले आहे. माझ्याकडे अजिबात पैसे नसून इतक्या रात्री कुठून जाऊन हे मला कळत नाहीये.