मुंबई : ‘कभी कभी लगता है अपुन ही भगवान है…’ अशा एकापेक्षा एक डायलॉगमुळे प्रसिद्धीझोतात आलेला बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी पतीवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण ही पहिली वेळ नाही, ज्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याआधी देखील अभिनेता तुफान चर्चेत आला. आता खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्यावर निशाणा साधला होता. एवढंच नाही तर, महिला वेटरसह वन नाइट स्टँडनंतर देखील अभिनेता चर्चेत आला होता.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने ‘ॲन ऑर्डिनरी लाइफ’ या पुस्तकात स्वतःच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये महिला वेटरसह वन नाइट स्टँडनंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याने घेतलेल्या मोठ्या निर्णयाबद्दल देखील सांगण्यात आलं आहे. एकदा नवाजुद्दीन न्यूयॉर्क याठिकाणी एका कॅफेमध्ये बसला होता. तेव्हा कॅफेमध्ये असलेल्या महिला वेटरने नवाज अभिनेता आहे हे ओळखलं..
त्यानंतर दोघांमध्ये काही वेळ गप्पा रंगल्या. त्यानंतर नवाजुद्दीनचा ‘द लंचबॉक्स’ हा सिनेमा पाहिल्याचं त्या महिलेनं सांगितलं. त्या भेटीचा किस्सा आणि महिला वेटरसह वन नाइट स्टँडबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या ‘ॲन ऑर्डिनरी लाइफ’ या पुस्तकात आहे.
शिवाय ‘ॲन ऑर्डिनरी लाइफ’ या पुस्तकात अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड निहारिका सिंह हिच्यासोबत असलेल्या नात्याचा देखील खुलासा करण्यात आला आहे. निहारिका सिंह हिच्यासोबत शारीरिक संबंध असल्याचं अभिनेत्याने पुस्तकात म्हटलं आहे. पण नवाजुद्दीन याने फक्त पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी नावाची बदनामी केल्याचा आरोप निहारिका हिने केला होता.
याप्रकरणी निहारिका हिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पुस्तकात अभिनेत्याने अभिनेत्री सुनीता रजवार हिच्यासोबत असलेल्या नात्याचा देखील खुलासा केला. मुंबईत आल्यानंतर नवाज कशाप्रकारे सुनिताच्या प्रेमात पडला याबद्दल देखील ‘ॲन ऑर्डिनरी लाइफ’ या पुस्तकात सांगण्यात आलं आहे.
सुनिता हिच्यासोबत अभिनेत्याची आत्महत्या करण्याचा विचार केला होता असं देखील पुस्तकात सांगण्यात आलं आहे. ज्यानंतर सु्निता हिने यावर विरोध करत नवाजुद्दीन सिद्दीकी याला कायदेशीर नोटीस बजावली. सुनिता हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कधीही सिरियस रिलेशनशिपमध्ये न राहण्याचा निर्णय नवाजुद्दीन सिद्दीकी याने घेतला होता असं देखील पुस्तकात सांगितलं आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या ‘ॲन ऑर्डिनरी लाइफ’ या पुस्तकावर अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर पुस्तकावर बंदी घालण्यात आली. कायम वादाच्या भोवऱ्यात असणारा नवाज आता पत्नीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे. आता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी यांच्यात असलेले वाद कोर्टात देखील पोहोचले आहेत.