मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya siddiqui) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आलिया सिद्दीकी हिने काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही गंभीर आरोप केले. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर होत असलेले आरोप पाहून त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याच्या पत्नीमधील वाद थेट कोर्टात पोहचला. नवाजुद्दीन सिद्दीकी याने बरीच दिवस एक्स पत्नीने केलेल्या आरोपांवर भाष्य करणे टाळले. मात्र, काही दिवसांनी सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी याने मोठा खुलासा केला. आलिया सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप करत होती.
आलिया सिद्दीकी हिने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर करत म्हटले होते की, मध्यरात्री मला आणि माझ्या मुलांना नवाजुद्दीन सिद्दीकी याने घराच्या बाहेर काढले आहे. आता माझ्याकडे पैसे नसून इतक्या रात्री मी कुठे जाऊ हेच मला कळत नसल्याचे आलिया सिद्दीकी हिने म्हटले होते. यावर नवाजुद्दीन सिद्दीकी याने स्पष्ट केले होते की, ते त्याचे घर नसून त्याच्या आईचे घर आहे.त्या घरातील सर्वकाही निर्णय त्याची आईचे घेते.
आयुष्यामध्ये या सर्व घटना घडत असताना आलिया सिद्दीकी हिने मोठा निर्णय घेत बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. आलिया सिद्दीकी बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेकांना वाटले की, आता आलिया सिद्दीकी ही मोठे खुलासे नवाजुद्दीन सिद्दीकी याच्याबद्दल करेल. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. बिग बाॅसच्या घरातील आलिया सिद्दीकी हिचा प्रवास अत्यंत कमी राहिला.
काही दिवसांपूर्वीच आलिया सिद्दीकी ही बिग बाॅस ओटीटीच्या घरातून बाहेर पडलीये. आलिया सिद्दीकी हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये आलिया सिद्दीकी ही तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलताना दिसली. इतकेच नाही तर तिने तिच्या लग्नाबद्दलही मोठा खुलासा केला आहे. आलिया सिद्दीकी हिने सांगितले की, तिचा एक बॉयफ्रेंड देखील आहे.
आलिया म्हणाली की, माझ्यासाठी आता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा विषय संपला आहे. माझा एक बॉयफ्रेंड असून मला त्याच्यासोबत चांगला वेळ घालवायचा आहे. मात्र, मी त्याच्यासोबत लग्न करणार नाहीये. विशेष म्हणजे आपण बॉयफ्रेंडसोबत खूप जास्त आनंदी असल्याचे देखील आलियाने म्हटले. नवाजुद्दीनच्या संपर्कात मी असेल कारण तो माझ्या मुलांचा बाप आहे. पण मी आता परत लग्न करणार नाहीये.