Kranti Redkar : क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याची धमकी, ‘ते’ स्क्रिनशॉट पोस्ट करत म्हणाल्या…

| Updated on: Mar 09, 2024 | 8:10 AM

Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याची धमकी, अभिनेत्रीने शेअर केलेले स्क्रिनशॉट धक्कादायक... शुक्रवारी अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मागितली मदत...

Kranti Redkar : क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याची धमकी, ते स्क्रिनशॉट पोस्ट करत म्हणाल्या...
Follow us on

मुंबई | 9 मार्च 2024 : आयआरएस अधिकार समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एवढंच नाहीतर, अश्लील संदेश देखील लिहिण्यात आल्याची माहिती मिळत आहे. क्रांती यांना पाकिस्तानी नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळत आहे. क्रांती यांनी एक्स (ट्विटर)वर काही स्क्रिनशॉट शेअर करत मदत मागितली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रांती हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

क्रांती रेडकर यांनी गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत अभिनेत्रीने जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा खुलासा केला आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘गेल्या एक वर्षापासून सतत जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. मला माझ्या मोबाईल नंबरवर विविध पाकिस्तानी नंबर आणि यूके नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.’

 

 

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. हेच तुम्हाला सांगायचं आहे. याबाबत पोलिसांना नियमितपणे माहिती देण्यात आली आहे.’ अभिनेत्रीने पोस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे.

अभिनेत्रीने पोस्टसोबतच ज्या नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील मेसेज आले होते त्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. यावर पोलीस पोलिस उपायुक्त आनंद भोईत म्हणाले, ‘आम्हाला एक अर्ज आला आहे. त्याची चौकशी करून पुढील कारवाई करू’ सध्या सर्वत्र क्रांतीची चर्चा सुरु आहे.

क्रांती रेडकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, क्रांती यांनी 2000 मध्ये ‘सून असावी आशी’ मालिकेतून करियरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. क्रांती हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. क्रांती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.