मुंबई | दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात. त्यामागे कारण देखील तसंच आहे. झगमगत्या विश्वात कधी कोणचं ब्रेकअप आणि घटस्फोट होईल सांगता येत नाही. पण ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. नीतू कपूर शेवटच्या क्षणापर्यंत पती ऋषी कपूर यांच्यासोबत होत्या. नीतू कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील त्यांच्या सौंदर्यावर फिदा झाले होते. पण नीतू कपूर यांच्या मनावर तर फक्त आणि फक्त ऋषी कपूर यांचं राज्य होतं. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली.
जेव्हा नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची भेट झाली तेव्हा अभिनेत्री फक्त १५ वर्षांची होती. महत्त्वाचं म्हणजे तेव्हा ऋषी कपूर यांची एक गर्लफ्रेंड होती. जेव्हा ऋषी कपूर यांची गर्लफ्रेंड नाराज असायची तेव्हा अभिनेते नीतू कपूर यांच्याकडून ‘प्रेमपत्र’ लिहून घ्यायचे. याच गोष्टींमुळे नीतू कपूर आणि ऋषी कपूर एकमेकांच्या अधिक जवळ येवू लागले.
नीतू कपूर यांच्यासोबत ऋषी कपूर यांची मैत्री फार घट्ट होती. पण ऋषी कपूर यांच्या मनात मात्र आता प्रेमाच्या भावना तयार झाल्या होत्या. अखेर नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. दोघांच्या नात्याबद्दल राज कपूर यांना कळल्यानंतर त्यांनी दोघांना लग्न करण्याचा सल्ला दिला.
पण ऋषी कपूर यांच्यासोबत लेकीचं असलेलं नातं नीतू कपूर यांच्या आईला मान्य नव्हतं. पण काही काळानंतर अभिनेत्रीच्या आईने देखील लेकीच्या नात्याला होकार दिला आणि मोठ्या उत्साहात नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचं लग्न झालं. १९७९ साली नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचं लग्न झालं.
लग्न सोहळ्यात दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. अशात नीतू कपूर बेशुद्ध झाल्यामुळे पाहुण्यांनी उपस्थित अनेक प्रश्न केले. पण जेव्हा खरं कारण कळल्यानंतर ऋषी कपूर देखील घाबरले होते. रिपोर्टनुसार, लग्नात नीतू यांनी जो लेहेंगा घातला होता, तो फार जड होता. याच कारणामुळे नीतू कपूर बेशुद्ध झाल्या होत्या.
तर दुसरीकडे, लग्नात प्रडंच पाहुण्यांची गर्दी असल्यामुळे ऋषी कपूर घाबरले होते आणि ते देखील बेशुद्ध पडले… असं देखील समोर आलं. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलाचं नाव रणबीर कपूर तर, मुलीचं नाव रिद्धिमा कपूर असं आहे… २०२० साली कर्करोगामुळे ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.