मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री नीतू कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नीतू कपूर यांचं सौंदर्य, सिनेमे, डान्स, अभिनय… इत्यादी गोष्टींमुळे त्या कायम चर्चेत असतात. पण एक वेळ अशी होती जेव्हा नीतू कपूर स्वतःमुळे नाही तर, पती ऋषी कपूर यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आले होते. नीतू कपूर यांच्यापूर्वी ऋषी कपूर यांच्या आयुष्यात एक मुलगी होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. तेव्हा नीतू कपूर आणि ऋषी कपूर एकमेकांचे चांगले मित्र होते. पण गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचं नातं घट्ट झालं. त्यानंतर कुटुंबाच्या सहमतीने दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर देखील ऋषी कपूर यांचे प्रेमसंबंध होते.
ऋषी कपूर यांचे अफेअर आणि न नाईट स्टँडबद्दल खुद्द नीतू कपूर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. एका मुलाखतीत नीतू कपूर म्हणाल्या, ‘इतर महिलांसोबत फ्लर्ट करताना मी ऋषी कपूर यांनी अनेकदा पाहिलं आहे. जेव्हा त्यांचं दुसऱ्या कोणत्या महिलेसोबत अफेअर सुरु असायचं, तेव्हा मला सर्व काही कळत होतं. पण मला माहिती होतं, त्यांचं अफेअर म्हणजे फक्त वन नाईट स्टँड होते…’
पुढे नीतू कपूर म्हणाल्या, ‘सुरुवातील सर्व ऐकून, बघून मला प्रचंड दुःख व्हायचं. यावरुन आमच्यात अनेकदा भांडणं देखील झाली. पण काही काळ उलटल्यानंतर मला काहीही फरक पडला नाही. कारण मला कळून चूकलं होतं की, ऋषी कपूर माझ्या शिवाय राहू शकत नाहीत. माझे अनेक मित्र होते, ते मला ऋषी यांच्याबद्दल सर्वकाही सांगायचे…’
पुढे पुरुषांच्या स्वातंत्र्याबद्दल नीतू कपूर म्हणाल्या, ‘पुरुषांना थोडं स्वातंत्र्य द्यायला हवं. फ्लर्ट करणं त्यांच्या स्वभावात असतं. पुरुषांना कोणीही बंधनात अडकवू शकत नाही. वन नाईट स्टँडपर्यंत ठिक होतं, पण नातं जास्त पुढे गेल असतं तर, मी म्हणाली असती जा तिच्यासोबतच राहा…’ ऋषी कपूर यांच्या निधनाला आज अनेक वर्ष झाली. पण कोणत्या कार्यक्रमात कपूर कुटुंबाला ऋषी कपूर यांनी कमी भासते..
ऋषी कपूर यांचं 2020 साली निधन झाले. या काळामध्ये त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी त्यांना खूप साथ दिली. परंतू ऋषी कपूर यांच्या जाण्यांनी नीतू कपूर यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. पतीच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली आहे.