घटस्फोटाची चर्चा असतानाच नेहा कक्करच्या पतीने शेअर केली ‘ही’ पोस्ट, म्हणाला, माझी बेबी..

| Updated on: Jun 09, 2024 | 11:34 AM

नेहा कक्कर ही कायमच चर्चेत असते. नेहा कक्करची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. नेहा कक्कर ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. विशेष म्हणजे नेहा कक्कर ही काही दिवसांपूर्वीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. नेहा कक्करच्या आयुष्यात वादळ आल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते.

घटस्फोटाची चर्चा असतानाच नेहा कक्करच्या पतीने शेअर केली ही पोस्ट, म्हणाला, माझी बेबी..
Neha Kakkar and Rohanpreet Singh
Follow us on

गायिका नेहा कक्कर ही कायमच चर्चेत असते. नेहा कक्कर हिने पंजाबी गायक रोहनप्रीत सिंह याच्यासोबत 2021मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे यांचे लव्ह मॅरेज झाले. अत्यंत खास पद्धतीने रोहनप्रीत आणि नेहा कक्करचे लग्न झाले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच नेहा कक्कर हिने आपला 36 वा वाढदिवस साजरा केलाय. पती रोहनप्रीत सिंहने नेहाच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. पत्नीवर प्रेमाचा वर्षावर करताना रोहनप्रीत सिंह हा दिसलाय.

हेच नाही तर रोहनप्रीत सिंह याने अत्यंत खास असा फोटोही शेअर केला. रोहनप्रीत सिंहने लिहिले की, माझी बेबी 16 वर्षांची झालीये. या जगातील सर्वात सुंदर व्यक्तीचा बर्थडे आहे. मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. पतीच्या या पोस्टवर नेहाने देखील रिप्लाय केल्याचे बघायला मिळतंय. रोहनप्रीत सिंहची पोस्ट आता चांगलीच व्हायरल होताना दिसतंय.

काही दिवसांपूर्वीच एक चर्चा तूफान रंगताना दिसली होती की, नेहा कक्कर हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले असून पती रोहनप्रीत सिंह याच्यासोबत वाद सुरू आहे. हेच नाही तर दोघे एकसोबत राहत नसल्याचे देखील सांगितले गेले. यानंतर मोठा धक्का सर्वांना बसला. यावर अनेक दिवस रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कर यांच्याकडून काही भाष्य देखील करण्यात आले नव्हते.

आता रोहनप्रीत सिंह याने सोशल मीडियावर नेहाच्या वाढदिवसाला शेअर केलेली पोस्ट पाहून सर्वकाही ठिक असल्याचे दिसत आहे. हेच नाही तर मध्यंतरी चर्चा होती की, रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कर हे घटस्फोट देखील घेऊ शकतात. यानंतर नेहा कक्कर हिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण देखील बघायला मिळाले. नेहा कक्कर ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

नेहा कक्कर सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील नेहा कक्कर दिसते. नेहा कक्कर हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चाहते दिसले. नेहा कक्कर हिने तिच्या आयुष्यामध्ये मोठा संघर्ष केला आहे. सुपरस्टार सिंगर 3 च्या मंचावर देखील नेहा कक्करचा वाढदिवस साजरा करण्यात आला.