Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचं राजकारणातील व्यक्तींसोबत देखील कनेक्शन आहे. सध्या एका आमदाराच्या मुलीची चर्चा रंगली आहे, जी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण तिला सिनेमांमध्ये कमी तर, जीम बाहेर अनेकदा स्पॉट केलं जातं. बहिणीसोबत तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. अभिनेत्रीच्या फिटनेसवर फक्त चाहते नाही तर, प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील फिदा आहे. सोशल मीडियावर देखील अभिनत्री फिटनेस टिप्स शेअर करत असते.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नेहा शर्मा आहे. नेहा कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. तिला अनेकदा जीम बाहेर देखील स्पॉट करण्यात आलं आहे. नेहा हिला कायम तिच्या बहिणीसोबत स्पॉट केलं जातं… नेहा शर्मा आणि बहीण आयेशा शर्मा यांनी जीम बाहेर स्पॉट करण्यात येतं…
सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटी देखील तिच्या फिटनेसवर फिदा आहे. वरुण धवन आणि अनिल कपूर यांसारखे सेलिब्रिटी नेहाच्या फिटनेसचं कौतुक करताना दिसतात. … नेहा कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.
नेहा शर्मा हिचे वडील काँग्रेस नेते आणि भागलपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. यावेळी नेहानेही वडिलांसोबत निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. अभिनेत्रीच्या वडिलांनीही लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावलं होतं, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. अजित शर्मा यांनी भागलपूर मतदारसंघातून तीनदा निवडणूक जिंकली आहे.
नेहा शर्मा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रुक’ सिनेमात भूमिका साकारल्यानंतर नेहा शर्मा चर्चेत आली. सिनेमाकडे चाहत्यांनी पाठ फिरवली पण नेहा आणि इमरान यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली.
‘क्रुक’ सिनेमानंतर नेहा ‘यंगिस्तान’, ‘मुबारकां’, ‘तुम बिन’, ‘क्या सुपरकूल हैं हम’ सिनेमांमध्ये देखील नेहा शर्मा हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण अद्याप नेहा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकली नाही.