Most Handsome Man In The World : दिसायला देखीव असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता जगातल्या ‘सर्वात हँडसम पुरुषा’चा शोध घेण्यात आला आहे. ‘ग्रीक गोल्डन रेशियो इक्वेशन’ अंतर्गत जगभरातून 10 पुरुषांची निवड करण्यात आली आहे. जगातील सर्वात दहा हँडसम पुरुषांची यादी कॉस्मेटिक सर्जन डॉ जूलियन डि सिल्वा यांनी तयार केली आहे. जगातल्या ‘सर्वात हँडसम पुरुषा’च्यां यादीमध्ये पहिल्या स्थानी नेटफ्लिक्स (Netflix) वरील लोकप्रिय ब्रिजर्टन (Bridgerton) सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव प्रथम स्थानी आहे.
ब्रिजर्टन सीरीजमध्ये सिमोन बसेट (Simon Basset) ही भूमिका साकारणारा अभिनेता रेगे जॉन पेज (Regé-Jean Page) जगातील सर्वात हँडसम पुरुष आहे. ग्रीक गोल्डन रेशियोनुसार रेगेचा चेहरा 93.65% योग्य असल्याचं आढळला आहे. या गुणोत्तरानुसार केवळ चेहऱ्याचं सौंदर्य तपासलं जातं. ही निवड करताना कंप्यूटराइज्ड मॅपिंग तंत्राचा वापर करण्यात आला आहे.
कंप्यूटराइज्ड मॅपिंग तंत्र ही सौंदर्य मोजण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. जी फार जुनी पद्धत आहे. जगातील सर्वात हँडसम पुरुषांच्या यादीमध्ये हेम्सवर्थ (Chris Hemsworth) स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी मायकल बी जॉर्डन (Michael B Jordan) तर चौथ्या स्थानी गायक हॅरी स्टायलस (Harry Styles) याचं नाव आहे.
कॉस्मेटिक सर्जन डॉ जूलियन डि सिल्वा यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये पाचव्या स्थानी फुटबॉलर ज्यूड बेलिंघम (Jude Bellingham), साहव्या स्थानी रॉबर्ट पॅटिनसन (Robert Pattinson) आहे. सातव्या स्थानी क्रिस इवांस (Chris Evans) असून आठव्या स्थानी जॉर्ज क्लूनी (George Clooney) आहे.
नवव्या आणि दहाव्या स्थानी क्रमशः हेनरी गोल्डिंग (Henry Golding) आणि ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) आहेत. सध्या जगातील हँडसम पुरुषांची यादी तुफान चर्चेत आहे.
कॉस्मेटिक सर्जन डॉ ज्युलियन डी सिल्वा यांनी जगातील सर्वात सुंदर पुरुषांची यादी तयार करण्यासाठी कंप्यूटराइज्ड मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. ज्युलियन यांनी चेहऱ्याची रचना ओठ, हनुवटी, ओठांची रुंदी, चेहऱ्याचा आकार, नाक, डोळ्यांची स्थिती आणि कपाळ अशा अनेक गोष्टी मोजल्या.
सांगायचं झालं तर, कॉस्मेटिक सर्जन डॉ ज्युलियन डी सिल्वा यांनी ग्रीक गोल्डन रेशियोच्या आधारावर जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून अंबर हर्ड (Amber Heard) हिची निवड केली होती. आता या यादीमध्ये रेगे जॉन पेज जगातील सर्वात हँडसम पुरुष आहे.