Israel-Hamas War : हमास विरोधात लढणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

| Updated on: Nov 12, 2023 | 2:33 PM

Israel-Hamas War : हमास विरोधात लढणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. शनिवारी अभिनेत्याची मृत्यूची माहिती समोर आली. अभिनेत्याच्या निधनानंतर चाहते आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा

Israel-Hamas War : हमास विरोधात लढणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Follow us on

Israel-Hamas War : इस्रायली नेटफ्लिक्स शो ‘फौदा’च्या प्रोडक्शन क्रूच्या सदस्याचा गाझामध्ये हमासशी लढताना मृत्यू झाला आहे. फौदा मालिकेच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शनिवारी ही माहिती देण्यात आली. ‘फौदा कुटुंबातील आमचा एक सदस्य मतन मीर गाझामध्ये लढताना मरण पावला आहे.. ही बातमी सांगतना आम्हाला प्रचंड दुःख होत आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या निधनाची चर्चा सुरु आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे चाहते आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे…

हमास विरोधात लढणाऱ्या मतन मीर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते फौदा क्रूचे महत्त्वाचे सदस्य होते. टीम फौदाने झालेल्या मोठ्या नुकसानानंतर एक्सवर दुःख व्यक्त केलं आहे. ‘फौदाचे सर्व अभिनेते आणि क्रू मेम्बर्स कधीही या दुःखद घटनेला विसरु शकणार नाही. आम्ही मातन पविवार आणि त्यांच्या मित्र-परिवारासाठी संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ…’

 

मातन मीर इस्रायली सैनिकांपैकी एक होते. मातन मीर यांचं निधन शुक्रवारी हमासशी लढताना झालं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘फौदा’ एक इस्रायली टेलीव्हीजन सीरिज आहे. ‘फौदा’ सीरिज ही इस्रायली संरक्षण दलाचे माजी सैनिक लिओर राज आणि अवी इश्कारोफ यांनी तयार केली आहे. सीरिज डिसेंबर 2016 मध्ये नेटफ्सिक्सवर प्रदर्शित करण्यात आली होती.

सांगायचं झालं तर ‘फौदा’ इस्रायलमधील सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. ‘फौदा’ सीरिज अरबी आणि हिब्रू भाषेत चित्रीत करण्यात आली आहे. सीरिज नेटफ्लिक्सवर इंग्रजी सबटायटल्ससह उपलब्ध आहे. सध्या सर्वत्र ‘फौदा’ सीरिजची चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायलमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे.

गाजा पट्टीत सुरु असलेलं हे युद्ध इतक्यात थांबण्याची शक्यता नाहीय. युद्ध विराम जाहीर करण्यासाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढत चालला आहे. या युद्धामध्ये अनेकांन प्राण गमावले आहे. एवढंच नाही तर, अनेत नागरिक गंभीर जखमी देखील आहे. युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ माजली आहे.