मुंबई: नवीन वर्ष सुरू झालंय आणि हे नवीन वर्ष नव्या सिनेमांचं असणार हे नक्की. अशीच एक नवी कथा सांगणारा प्रेमाची वेगळी परिभाषा समजवायला येतोय ‘लॉ ऑफ लव्ह’ (law of love) हा सिनेमा आहे. आज नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच संक्रांत(sankranti) आहे. याच शुभमुहूर्तावर ‘लॉ ऑफ लव्ह’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. जे. उदय (j. uday) यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या 4 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
अभिनेत्री शालवी शाह या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच अभिनेते जे. उदय यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात ते अभिनय करताना देखील पहायला मिळणार आहे. याचबरोबर या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. ‘या सिनेमाची गोष्ट वेगळी आहे. प्रेमाचा अर्थ तुम्हाला नव्याने सांगणारी आहे. त्यामुळे वेगळ्या कथेच्या शोधात असणाऱ्या सिनेरसिकांनी हा सिनेमा बघितलाच पाहिजे,’ असं निर्माते जे. उदय यांनी सांगितलं आहे.
‘लॉ ऑफ लव्ह’ कधी प्रदर्शित होणार?
फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना आणि याच प्रेमाच्या महिन्यात प्रेमाचा अर्थ नव्याने उलगडून सांगायला ‘लॉ ऑफ लव्ह’ हा चित्रपट येतोय. व्हॅलेंटाईन महिन्यात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
वेदिका फिल्म क्रिएशननिर्मित ‘लॉ ऑफ लव्ह’ येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रेमाची नवी परिभाषा चित्रपटामार्फत सांगण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, आम्हाला खात्री आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात आम्ही यशस्वी होऊ’, असं या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सांगण्यात आलं. त्यामुळे या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल.
संबंधित बातम्या