मुंबई : सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हा विचार घेऊन ‘रंग माझा वेगळा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड जवळची वाटू लागली. अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात मालिकांचं एक वेगळं स्थान असतं. कालांतरानं आवडत्या मालिका आवडते कलाकार त्यांच्या आयुष्यात होणारे बदल आपलेसे वाटायला लागतात.आपल्या आवडत्या मालिकेत आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. तर स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’मालिकेत आता चिमुकल्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. आईचं सुख मिळवण्यासाठी नेहमी धडपडणारी दीपा आता स्वत: आई होणार आहे.
मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या दीपाला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे राधाईला आई मानत तिनं ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि सर्वस्व झाला. अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होत गेली. आता दीपाच्या आयुष्यात महत्त्वाचं वळण आलं आहे. ती आई होणार आहे. त्यामुळे ती नक्कीच खूप खूश आहे. या बाळाचं आगमण होणार ही गोष्ट एकताच प्रेक्षक तर आनंदी झालेच मात्र मालिकेतील कलाकार सुद्धा प्रचंड खूश आहेत. या बद्दल सांगताना दीपा म्हणजेच रेश्मा शिंदेनं आनंद व्यक्त केला आहे. सोबतच सेटवरही आनंदाचं वातावरण असल्याचं तिनं सांगितलं आहे. त्यामुळे पुढील भाग शूट करण्यात कलाकार धमाल करणार आहेत.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतलं हे वळण उत्कंठा वाढवणारं असलं तरी दीपाची ही गूड न्यूज इनामदार कुटुंबात कश्या पद्धतीने स्वीकारली जाणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
संबंधित बातम्या
Caller Tune | महानायकाच्या आवाजातील कोरोना ‘कॉलर ट्यून’ बंद होणार! आता ऐकू येणार लसीकरणाची धून…