काकांविरुद्ध उभा राहिला अल्लू अर्जुन? साऊथ स्टार्सच्या मोठ्या कुटुंबात वादाची ठिणगी

| Updated on: Aug 02, 2024 | 4:41 PM

अल्लू अर्जुनने ज्यांची भेट घेतली ते किशोर रेड्डी मात्र निवडणुकीत पराभूत झाले. YSRCP च्या एनएमडी फारुक यांच्याकडून 12 हजार पेक्षा जास्त मतांनी त्यांनी नंद्यालची जागा गमावली. पवन कल्याम हे पीठापुरम मतदारसंघातून आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य आहेत आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.

काकांविरुद्ध उभा राहिला अल्लू अर्जुन? साऊथ स्टार्सच्या मोठ्या कुटुंबात वादाची ठिणगी
अल्लू अर्जुन, पवन कल्याण आणि निहारिका
Image Credit source: Instagram
Follow us on

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘पॉवर स्टार’ पवन कल्याण यांच्यासाठी नुकतीच झालेली आंध्र प्रदेश विधानसभेची निवडणूक महत्त्वपूर्ण होती. कारण या निवडणुकीत त्यांच्या जनसेना पक्षाने (JSP) 21 जागा जिंकल्या आणि 135 जागा मिळवून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसम पार्टीने (TDP) सत्ता ताब्यात घेतली. मात्र या विजयामुळे पवन कल्याण यांच्या कुटुंबात तेढ निर्माण झाल्याचं दिसत आहे. पवन कल्याण हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध आणि श्रीमंत अशा अल्लू-कोनिडेला कुटुंबाचा एक भाग आहेत. मेगास्टार चिरंजीवी, अल्लू अरविंद, नागेंद्र बाबू, अल्लू अर्जुन आणि रामचरण हे सर्व कलाकार याच कुटुंबातून आहेत.

अल्लू अर्जुनच्या ‘त्या’ भेटीवरून वाद

निवडणुकीपूर्वी अभिनेता अल्लू अर्जुनने YSRCP नंद्याल उमेदवार सिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांची भेट घेतली होती. जरी जेएसपी आणि टीडीपी हे जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाविरुद्ध निवडणूक लढवत होते, तरी या भेटीमुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. अल्लू अर्जुनच्या या भेटीनंतर नागेंद्र बाबूने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक सूचक पोस्ट लिहिली होती. हे ट्विट त्यांनी अल्लू अर्जुनला उद्देशून लिहिल्याचं अनेकांना वाटत होतं. ‘जो आमच्यासोबत असून विरोधकांसाठी काम करतो, तो आमचा असला तरी अनोळखी आहे आणि जो आमच्यासोबत उभा आहे, तो अनोळखी असला तरी तो आमचाच आहे’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली होती. नंतर त्यांनी ही पोस्ट काढून टाकली.

काय म्हणाला अल्लू अर्जुन?

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अल्लू अर्जुनने माध्यमांना स्पष्ट केलं होतं की तो तटस्थ आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. “कोणत्याही राजकीय पक्षाची पर्वा न करता मी माझ्या जवळच्या व्यक्तींना आणि प्रियजनांना नेहमीच पाठिंबा देतो. मग ते माझे काका पवन कल्याण असो, नंद्यालमधील माझे मित्र सिल्पा चंद्र रविरेड्डी असो किंवा माझे सासरे चंद्रशेखर रेड्डी असोत. माझ्या जवळच्या लोकांसाठी माझा पाठिंबा नेहमीच असेल”, असं त्याने म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

निहारिकाची प्रतिक्रिया

आता अल्लू अर्जुनची चुलत बहीण आणि नागेंद्र बाबू यांची मुलगी निहारिका कोनिडेला हीने कौटुंबिक मतभेदांवर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही खरंतर याविषयी जास्त बोललो नाही. आम्ही याबद्दल घरी बोललो नाही, कारण प्रत्येकाची स्वत:ची कारणं असतात. राजकीय, धार्मिक, अध्यात्मिकदृष्ट्या प्रत्येकाला हवं ते करण्याचा पर्याय आहे”, असं ती म्हणाली. यावेळी निहारिकाने तिच्या वडिलांचं ट्विट अल्लू अर्जुनबद्दल असल्याच्या चर्चांना फेटाळलं आहे. त्यांनी ते मत दुसऱ्या विषयावर मांडलं असावं, असं निहारिका म्हणाली. याविषयी तिने पुढे सांगितलं, “माझ्यासाठी नेहमीच कुटुंबाला प्राधान्य असेल आणि मी फक्त माझ्याबद्दल बोलू शकते.”