कानपट्टीवर पिस्तुल लावली, चाकू ठेवला… घरात घुसून प्रसिद्ध अभिनेत्रीवर हल्ला; घरातल्या लोकांनी…

| Updated on: Oct 16, 2023 | 10:47 AM

घरातल्या लोकांनी अभिनेत्रीवर डाव साधला आहे. घडलेल्या घटनेमुळे अभिनेत्री घाबरली असून, तिने पोलिसांची मदत घेतली आहे. एवढंच नाही तर, खुद्द अभिनेत्रीने घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे पण... सध्या सर्वत्र बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची चर्चा...

कानपट्टीवर पिस्तुल लावली, चाकू ठेवला... घरात घुसून प्रसिद्ध अभिनेत्रीवर हल्ला; घरातल्या लोकांनी...
Follow us on

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूड अभिनेत्री निकिता रावल हिच्याबाबत एक धक्कादायक घटनासमोर येत आहे. घरातल्या लोकांनी अभिनेत्रीवर डाव साधला आहे. घडलेल्या घटनेमुळे अभिनेत्री घाबरली असून, निकिता हिने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, ‘अभिनेत्री जेव्हा घरी होती, तेव्हा घरातील स्टाफने पिस्तुल दाखवत ३.५ लाख रुपये लंपास केले. एवढंच नाही तर, काही गुंड अभिनेत्रीला धमकी देवून फरार झाल्याची माहिती समोर येत आहेत. आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर जीवा मारु… अशी धमकी अभिनेत्री निकिता रावल हिला देण्यात आली. प्राण जाण्याच्या भीतीने अभिनेत्रीने देखील हल्ला करणाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, हल्ला करणाऱ्यामध्ये अभिनेत्रीच्या घरातील एक स्टाफ देखील होता. निकीता हिच्या घरी काम करणाऱ्या स्टाफने अन्य लोकांच्या मदतीत हे कृत्य केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकीता हिच्या घरी कोणी नसताना आरोपींनी चोरी करण्यासाठी वेळ निश्चित केली . दरोडा टाकून आरोपी फरार झाला असून निकिताला या घटनेचा धक्का बसला आहे. अभिनेत्रीने मुंबईतील मालाड बांगूर नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

घडलेल्या घटनेवर निकिता हिने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी गंभीर स्थितीत आहे. माझ्या घरातील स्टाफने असं केलं यावर माझा विश्वास बसत नाही. आधी लोकं विश्वात संपादन करतात, त्यानंतर घात करतात. गुंडांनी माझ्या कानपट्टीवर पिस्तुल लावली, चाकू ठेवला अशा परिस्थितीत मला काहीही करता आलं नाही. ते सतत मला धमकावत होते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

हे सुद्धा वाचा

मेहनतीने कमावली होती संपत्ती…

अभिनेत्री म्हणाली, ‘जवळपास ३.५ लाख रुपयांची रोकड आणि दागिने चोरुन गुंड फरार झाले आहे. मी मेहनतीने संपत्ती जमा केली होती. हा एक भयानक अनुभव होता आणि मी ते शब्दात सांगू शकत नाही. मी एफआयआर दाखल केला आहे. माझे दागिने आणि पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.’

निकिता रावल हिचे सिनेमे…

निकिता हिने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेता अनिल कपूर यांच्यासोबत ‘ब्लॅक अँड व्हाइट’ सिनेमात तर जॉनसोबत ‘गरम मसाला’ या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.