बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे सीजन चांगलेच धमाल करताना दिसत आहे. वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. रितेश देशमुख हा भाऊच्या धक्क्यामध्ये घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना कायमच दिसतो. बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप पडले आहेत. वर्षा उसगांवकर या ग्रुप ‘बी’मध्ये आहेत. मात्र, नेहमीच घरातील सर्व सदस्यांमध्ये मिळून राहताना वर्षा उसगांवकर या दिसतात. मात्र, आता तिच गोष्ट त्यांच्याच ग्रुपमधील सदस्यांना पटत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
वर्षा उसगांवकर या निकी तांबोळी आणि अरबाज खान यांच्यासोबत चांगले वागत असल्याचे पॅडी कांबळे, अभिजीत सावंत आणि अंकिता यांना आवडत नाहीये. हेच नाही तर कॅप्टनसी टास्कमध्येही वर्षा उसगांवकर यांना अजिबात सपोर्ट न करताना त्यांच्या ग्रुपमधील सदस्य दिसले. यामुळेच अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन झालाय.
नुकताच आता निकी तांबोळी हिने वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल अत्यंत हैराण करणारे भाष्य केले आहे. निकी तांबोळीचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. निकी तांबोळी ही थेट म्हणाली की, मी बिग बॉसच्या घरात येण्याच्या अगोदर फक्त अभिजीत सावंत सोडला तर इतर कोणालाही ओळख नव्हती. बाकी कोण आहेत आणि त्यांनी काय काम केले हे मला माहिती नव्हते.
यावेळी निकीला विचारण्यात आले की, तू वर्षा उसगांवकर यांनाही ओळखत नव्हती? यावर निकी म्हणाली की, मला खरोखरच माहिती नव्हते की, वर्षा उसगांवकर कोण आहेत…वर्षा उसगांवकर इतक्या मोठ्या अभिनेत्री आहेत, त्यांनी इतके हीट चित्रपट दिली आहेत आणि तू म्हणते की, त्यांना ओळखत नाही? यावर निकी स्पष्टपणे म्हणताना दिसते की, नव्हते ओळखत यार…
आता मी त्यांना ओळखते त्या खूप मोठ्या दिग्गज अभिनेत्री आहेत. नव्हते अगोदर मला माहिती. आता निकी तांबोळी हिने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सुरूवातीच्या काळात बिग बॉसच्या घरात निकी तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये जोरदार वाद हा बघायला मिळाला. हेच नाही तर निकीने वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल चुकीचे विधान देखील केले होते. त्यानंतर तिच्यावर सडकून टीका देखील करण्यात आली होती.