Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’ शोचं पाचवं पर्व हे अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार निक्की तांबोळी हिच्यामुळे रंगात असं म्हणायला हरकत नाही. काही झालं तरी निक्कीच्या तोंडून निघणारा ‘बाई…’ हा शब्द तर सोशल मीडियावर ट्रेंड झाला. शिवाय निक्कीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता बिग बॉस संपल्यानंतर देखील सर्वत्र निक्की तांबोळी हिच्या चर्चा रंगल्या आहेत. आता सध्या निक्कीच्या एका वक्तव्याची तुफान चर्चे रंगील आहे.
सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात नुक्की प्रत्येक टास्कमध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसली. फिनालेच्या चौथ्या फेरीमध्ये अभिनेता आणि शोचा होस्ट रितेश देशमुख याने स्पर्धकांना सांगितलं, ‘या फेरीमध्ये तुम्ही तुमच्या घरातील एक सदस्याला बोळू शकता…’
पुढे रितेश याने निक्कीला विचारलं आई – वडिलांपैकी तू कोणाला बोलू इच्छिते? यावर निक्की म्हणाली, ‘मी माध्या आईला बोलू इच्छिचे कारण माझे वडील प्रचंड भावनिक आहेत. माझी आई खंबीर आहे. त्यामुळे माझ्या आईला बोलवेल..’, सध्या निक्कीच्या या वक्तव्याची तुफान चर्चा रंगली आहे.
निक्की तांबोळी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांचना 3’ या तामिळ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट देखील ठरला. त्यानंतर 2020 मध्ये अभिनेत्री ‘बिग बॉस 14’ मध्ये झळकली. ‘खतरो के खिलाडी’मध्ये देखील निक्की स्पर्धक म्हणून सहभागी झाली. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी 5’ शोमुळे निक्की हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली.
निक्की सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर निक्कीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
‘बिग बॉस मराठी 5’ शोच्या शर्यतीत निक्की तांबोळी देखील होती. पण अभिनेत्री विजयापर्यंत पोहोचू शकली नाही. ‘बिग बॉस मराठी 5’ शोची ट्रॉफी सूरज चव्हाण यांने जिंकली. तर अभिजीत सावंत याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानवं लागलं.