Photo : निशा रावलनं बंद केले घरातील सीसीटीव्ही कॅमेरे, आता सांगितलं कारण…
भांडणापूर्वी निशानं कॅमेरे बंद केल्याचं करणनं म्हटलं होतं. आता निशानं यावर भाष्य केलं आहे आणि कॅमेरा बंद करण्यामागील कारण तिनं सांगितलं आहे. (Nisha Rawal turns off CCTV cameras at home, now she says because ..)
1 / 7
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहरावर पत्नी निशा रावल यांनी घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. यामुळे करणला पोलिसांनी अटकही केली. मात्र, आता करण जामिनावर बाहेर आहे.
2 / 7
त्यांच्या संभाषणात करण आणि निशा दोघांनीही घरात कॅमेरा ठेवण्याविषयी बोललं होतं.
3 / 7
भांडणापूर्वी निशानं कॅमेरे बंद केल्याचं करणनं म्हटलं होतं. आता निशा यावर बोलली आहे आणि कॅमेरा बंद करण्यामागील कारण तिनं सांगितलं आहे.
4 / 7
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना करण मेहरानं सांगितलं की आमच्या 4 बीएचकेमध्ये 7 कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
5 / 7
बेडरुम वगळता प्रत्येक खोलीत एक कॅमेरा आहे. हॉलमधील कॅमेरा अशा कोपऱ्यात आहे की तेथून हे दिसलं नाही की निशानं भिंतीवर स्वत: डोकं मारलं. जर माझ्याकडे फुटेज असत तर सर्व काही स्पष्ट झालं असतं.
6 / 7
या चर्चेवर उत्तर देताना निशा म्हणाली - हो कॅमेरा बंद होता. काही काळापूर्वी मी कॅमेरा बंद केला.
7 / 7
जिथं जिथं कॅमेरा बसवला होता तिथं करण माझ्याशी आणि कवीशशी खूप चांगला वागला. बेडरूममध्ये करणची वागणूक वेगळी होती, मात्र जिथं कॅमेरा नव्हता तिथे तो मला शिवीगाळ आणि मारहाण करत होता, म्हणून काही दिवसांपूर्वी मी कॅमेरे बंद केले.