मुंबई | 9 मार्च 2024 : गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंब अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडींग सेलिब्रेशनमुळे चर्चेत आहेत. दोघांच्या प्री-वेडिंगसाठी फक्त सेलिब्रिटी नाहीतर, जगभरातून असंख्य दिग्गज व्यक्तींनी त्यांच्या प्री-वेडींग सेलिब्रेशनसाठी हजेरी लावली. सोशल मीडियावर देखील प्री-वेडींग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण अंबानी कुटुंब फक्त त्यांच्या व्यवसायामुळे आणि कार्यक्रमांमुळे नाहीतर, इतर कारणांमुळे देखील चर्चेत असतं. एका मॅगझिनच्या मुलाखतीत नीता अंबानी यांनी आजीच्या भूमिकेत असल्यानंतर येणाऱ्या अनुभवांबद्दल वक्तव्य केलं.
नीता अंबानी म्हणाल्या, ‘मला माझा मोठा मुलगा आकाश अंबानी नेहमी त्यांना सांगतो तू आजी आहेस आई होऊ नकोस… मुलांवर आजी म्हणून प्रेम कर. मला स्वतःला आता असं वाटतं की, मला आता माझ्या मुलांना त्यांचं मुलांचा सांभाळ करण्यासाठी स्पेस दिली पाहिजे… मला माझ्या नातवंडांवर आई म्हणून नाही तर, आता आजी म्हणून प्रेम करायचं आहे..’
‘नातवंडांवर मला फक्त प्रेम करायचं आहे. त्यांना धाकात ठेवण्याचं काम त्यांच्या आई-वडिलांचं आहे. माझी मुलं लहान असताना मला प्रचंड काळजी वाटायची. मुलं कायम मोठ्यांचं अनुकरण करत असतात. मला वाटतं की आजी या नात्याने घरातील चिमुकल्यांना मूल्ये शिकवणे ही माझी जबाबदारी आहे.’ असं देखील नीता अंबानी म्हणाल्या..’
नीता अंबानी यांच्या नातवंडांबद्दल सांगायचं झालं तर, पृथ्वी, कृष्णा, आदिया आणि वेदा… अशी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या नातवंडांची नावे आहेत. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या मुलांची नावं पृथ्वी आणि वेदा अशी आहेत. तर ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या मुलांची नावे कृष्णा आणि आदिया अशी आहेत.
नीता अंबानी कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता नीता – मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंद अंबानी यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. अनंद – राधिका यांचं लग्न 12 जुलै रोजी होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबाची चर्चा रंगली आहे.