मुंबई | बॉलिवूडमधील काही कलाकार देशातील अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडत असतात. अभिनेत्री कंगना रानौत कायम राजकारणावर वादग्रस्त भूमिका बजावत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री काजोल हिने देखील देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ज्यावर आजच्या सामना अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय नितेश राणे यांनी कंगना रनौत हिच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित केले.
नितेश राणे म्हणाले, ‘आज सामनामध्ये काजोलच्या नावाने बाजू घेतली आहे. संजय राऊतला विचारीन मग कंगना रानौतची काय चूक होती. तिने उद्धव ठाकरे, बॉलिवूड, आदित्य ठाकरे आणि सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल भूमिका घेतली म्हणून तुझे बीएमसी अधिकारी सत्य नारायणची पूजा घालयाल गेले होते काय?
‘सुशांत सिंह राजपूतची काय चूक होती. तुझ्या मालकाच्या मुलाने (सुशांत) त्याची काय स्थिती केली होती. याबद्दल तो सर्व सत्य सांगणार होता. काजोची एवढी बाजू घेता असताना ज्या ज्या लोकांनी तुझ्या मालकाचा, विचारांचा विरोध केलाय त्यांची कार्यालये तोडली, मारुन टाकलय त्यावर आधी अग्रलेख लिही…’ अशी स्पष्ट भूमिका बजावत नितेश राणे यांनी संजय राऊत – ठाकरेंना सवाल केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकीय नेते भारत देश चालवत आहेत, असं काजोल म्हणाली. तिच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आजच्या सामना अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं. ज्यावर नितेश राणे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.
कंगना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अभिनेत्री अनेकदा बॉलिवूड आणि राजकारणावर प्रश्न उपस्थित केले. ज्यामुळे बॉलिवूडमधील अनेक गोष्टी समोर आल्या. कंगना कायम तिच्या वादग्रस्त भूमिकेमुळे चर्चेत असते.