मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी स्वतःला संपवलं. स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी शेवटचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडीओमध्ये कर्मचाऱ्यांना आढळून आला. वाढदिवसाच्या चार दिवस आधी नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांचा वाढदिवस आहे. नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या पोलीस नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
बुधवारी स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोना काळात तब्बल दोन वर्ष नितीन देसाई यांचा स्टुडिओ बंद होता. हळू-हळू एनडी स्टुडिओमध्ये शुटिंगची सुरुवात झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, स्टुडिओमध्ये अभिनेता गुरमीत चौधरी आणि अभिनेत्री रिद्धिमा पंडित यांच्या वेब सीरिजची शुटिंग सुरु होणार होती.
महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये खुद्द नितीन देसाई काम करणार होते. हॉटस्टारच्या या प्रोजेक्टचे काही भाग देखील शूट झाले होते. ऑक्टोबर महिन्यात खुद्द नितीन देसाई सीरिजचं दुसरं शेड्यूल सुरु करणार होते. पण नितीन देसाई यांचं नवं स्वप्न पूर्ण होवू शकलं नाही.
नितीन देसाईंचा हा शेवटचा प्रोजेक्ट अपूर्ण राहिला असला तरी, महाराणा प्रतापच्या टीमला नवीन ठिकाणी सेट तयार करून घ्यावा लागेल की नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये शूटिंग पूर्ण होईल याबद्दल अधिक माहिती कळालेली नाही. यासंबंधी गुरमीत चौधरी याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. पण अभिनेत्याकडून कोणता प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, नितीन देसाई यांच्या निधनानंतर महाराणा प्रताप यांच्या टीमलाच नाही तर सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे की एनडी स्टुडिओचे काय होणार? २००५ मध्ये नितीन देसाई यांनी एनडी स्टुडीओची स्थापना केली होती. त्यांच्या स्टुडिओमध्ये अनेक सिनेमांचं शुटिंग पूर्ण झालं. त्याच स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला.
आता नितीन देसाई मृ्त्यू प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. नितीन देसाई यांच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर पाच जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.