माझ्या बॉडी पार्टवर कॅमेरा झूम करतात आणि…, नोरा फतेही हिने कोणावर साधला निशाणा?

| Updated on: Apr 23, 2024 | 1:02 PM

Nore Fsatehi | 'माझ्या बॉडी पार्टवर कॅमेरा झूम करणतात आणि...', फक्त नोरा फतेही हिलाच नाही तर, अनेक अभिनेत्रींना करावा लागतोय 'या' वाईट प्रसंगाचा सामना, अभिनेत्रीने कोणावर साधला आहे निशाणा? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या चर्चा...

माझ्या बॉडी पार्टवर कॅमेरा झूम करतात आणि..., नोरा फतेही हिने कोणावर साधला निशाणा?
Follow us on

बॉलिवूडची ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. पापाराझींमध्ये देखील नोरा प्रचंड प्रसिद्ध आहे. पण अनेकदा नोरा हिला पापाराझींची वागणूक बिलकूल आवडत नाही. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने पापाराझींवर निशाणा साधला आहे. अभिनेत्री म्हणते, ‘पापाराझी बॉडी पार्टवर कॅमेरा झूम करतात आणि हे फक्त माझ्यासोबतच नाही तर, अनेक अभिनेत्रींसोबत होतं..’

सांगायचं झालं तर, सेलिब्रिटी आणि पापाराझी यांच्यामध्ये खास संबंध आहेत. कारण सेलिब्रिटींना पापाराझींची गरज असते आणि पापाराझींना सेलिब्रिटींची… सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींची चर्चा रंगलेली असते. पण याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी पापाराझींवर संताप व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

नुकताच झालेल्या मुलाखतीत नोरा फतेही म्हणाली, ‘मला असं वाटतं त्यांनी याआधी कधी हीप पाहिले नसतील. जे आहे ते आहे… पापाराझी असं फक्त माझ्यासोबत नाहीतर, इतर अभिनेत्रींसोबत देखील असं करतात. पापाराझी शरीराच्या दुसऱ्या भागांवर देखील झूम करतात. त्यामुळे असं वाटतं, त्यांच्याकडे झूम करण्यासाठी दुसरं काहीही नाही. ‘

‘पापाराझींच्या अशा वगणुकीचा मी माझ्यावर कोणताही परिणाम होऊ देत नाही. मला माझ्या शरीरावर गर्व आहे. दुर्दैवाने सोशल मीडियावर या गोष्टी ट्रेंड होत आहेत. ते फक्त सोशल मीडिया अल्गोरिदम गेम खेळत आहेत. सुदैवाने मला चांगली शरीरयष्टी मिळाली आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मला त्याची लाज वाटत नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

 

 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नोरा हिने तिच्या डान्सने चाहत्यांना देखील ताल धरायला लावला आहे. नोरा हिने अनेक सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.