मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही नेहमीच चर्चेत असते. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) प्रकरणात नोरा फतेही हिचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. विशेष म्हणजे या प्रकरणात नोरा फतेही (Nora Fatehi) हिची चाैकशी देखील करण्यात आली. नोरा फतेही हिला सुकेश चंद्रशेखर याने काही महागडे गिफ्ट दिल्याचे सांगितले जाते. इतकेच नाही तर नोरा फतेही ही बऱ्याच वेळा सुकेश चंद्रशेखर याला भेटल्याचा देखील आरोप (Accusation) हा केला जातोय. मात्र, सुकेश चंद्रशेअर आणि आपले काहीच संबंध नसल्याचे काही दिवसांपूर्वीच नोरा फतेही हिने स्पष्ट केले. इतकेच नाही तर सुकेश याने कोणत्याही प्रकारचे आपल्याला गिफ्ट न दिल्याचे नोराने स्पष्ट केले.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही हिची इतक्यांदा चाैकशी झाल्याने हे स्पष्ट आहे की, नोरा फतेही ही सुकेश चंद्रशेखर यांच्या संपर्कात नक्कीच होती. नोरा फतेही हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. फक्त नोरा फतेही हिच नाही तर सुकेश चंद्रशेखर हा बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या संपर्कामध्ये होता.
नुकताच नोरा फतेही हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. नोरा फतेही हिचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला. नोरा फतेही हिचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ मुंबईतील एका कार्यक्रमातील आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी खास नोरा फतेही हिने साडी घातल्याचे दिसत आहे.
डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या फॅशन शोचे मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. याच शोला नोरा फतेही हिच्यासह अनेक बाॅलिवूडच्या मोठ्या स्टारने हजेरी लावली होती. नोरा फतेही हिचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा याच फॅशन शोमधील आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये साडीमध्ये नोरा फतेही हिचा लूक जबरदस्त दिसतोय.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ऊप्स मूमेंटची शिकार होताना थोडक्यात नोरा फतेही ही वाचली आहे. साडी घातल्यामुळे नोरा फतेही हिला व्यवस्थित चालता येत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता ऊप्स मूमेंट नोरा फतेही हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर आता चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.