अभिनेता हृतिक रोशन स्टारर ‘कहो ना प्यार है’ सिनेमा 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. 90 च्या दशकातील प्रत्येकाला ‘कहो ना प्यार है’ सिनेमा आठवत असेलच. सिनेमात हृतिक रोशन आणि अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होते. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास 24 वर्ष झाले आहेत. पण आजही सिनेमातील काही सीन आणि गाणी चाहत्यांना प्रचंड आवडतात. सिनेमात हृतिक आणि अमिषा यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण हृतिक याच्या लहान भावाची भूमिका साकारलेल्या चिमुकल्याने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं.
सिनेमातील बालकलाकाराची देखील सर्वत्र चर्चा रंगली. पण आता सिनेमातील बालकलाकाराला पाहिल्यानंतर तुम्हाला देखील थक्का बसेल. सिनेमात बालकलाकाराने अमित या भूमिकेला न्याय दिला होता. पण आता अभिनेत्याला पाहिल्यानंतर तुम्हाला देखील ओळखणं कठीण होईल.
सांगायचं झालं तर, ‘कहो ना प्यार है’ सिनेमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि या सिनेमाने अनेक पुरस्कारही जिंकले. या सिनेमानंतर हृतिक रातोरात स्टार झाला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सिनेमात हृतिक आणि अमिषा पटेलची दमदार जोडी दिसली होती. तर सिनेमात अभिनेत्याच्या लहान भावाच्या भूमिका साकारणाऱ्या मुलाचं नाव अभिषेक शर्मा असं आहे.
अभिषेक शर्मा आता टीव्ही विश्वावर राज्य करत आहे. अभिषेक शर्मा सोशल मीडियावर देखील कामय सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिषेक कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो…
बालकलाकाराच्या भूमिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य केल्यानंतर, ‘मिले जब हम तुम’ मालिकेतून अभिनेत्याने टीव्ही विश्वात पदार्पण केलं. ही मालिका 2008 मध्ये प्रसारित झाली होती. या मालिकेनंतर अभिषेक याने अनके मालिकांमध्ये काम केलं आहे.
‘हीरो – गायब मोड ऑन’, ‘दिल दियां गल्लां’,’पंड्या स्टोर’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक शर्मा याची चर्चा रंगली आहे.
झगमगत्या विश्वात काम करत असताना अभिनेत्याने 2022 मध्ये कानन शर्मा हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नाचे फोटो अभिनेत्याने पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून अभिषेक याला शुभेच्छांचा वर्षाव केला…