अभिनेता आमिर खान याच्या लेकीने लग्नानंतर फार मोठा खुलासा केला आहे. आयरा हिने पती नुपूर शिखरे यांच्याबद्दल मोठा खुलासा केली आहे. सांगायचं झालं तर, नुपूर आणि आयरा यांची पहिली भेट झाली तेव्हा आमिरची लेक फक्त 17 वर्षांची होती. नुकताच, आयरा हिने नुपूरच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. आयरा म्हणाली, आमची भेट झाली तेव्हा नुपूरचा साखरपुडा दुसऱ्या मुलीसोबत झाला होता. माझ्या मनात अद्यापही गिल्ट आहे… असं देखील आयरा म्हणाली.
आयरा हिने Reddit वर आस्त मी एनिथिंग सेशन होस्ट केला होता. या सेशन दरम्यान एका यूजरने आयराला विचारलं… ‘फिटनेस फ्रिक असलेल्या व्यक्तीसोबत राहिल्यामुळे तुझ्या फिटनेसवर किती प्रभाव पडला आहे?’ यावर आयरा म्हणाली, ‘खरं तर फिटनेससाठीच माझी आणि नुपूरची ओळख झाली होती.’
‘तेव्हा मी फक्त 17 वर्षांची होती आणि नुपूरचा साखरपुडा झालेला होता. अनेक काळ आम्ही एकत्र वर्कआउट केलं. पण जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली तेव्हापासून वर्कआउट करणं बंद झालं… माझ्या मनात अद्यापही गिल्ट आहे की नुपूर फिट आणि मी अनफिट… मी पुरेस प्रयत्न देखील करत नाही… नुपूर माझ्यापेक्षा चांगला जोडीदार डिजर्व करतो… जो फिटनेस फ्रिक असेल…’ असं देखील आयरा म्हणाली.
आयरा आणि नुपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष दोघांना एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी आयरा कायम नुपूर याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायची. आयरा हिचा पती नुपूर तिच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठा आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात येत.
दोघांच्या वयात देखील फार मोठा अंतर आहे. आयरा 26 वर्षांची आहे, तर नुपूर 38 वर्षांचा आहे. नुपूर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे. त्याने आमिर, सुश्मिता सेन आणि इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे.