मुंबई | टीव्ही विश्वातील एक अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. पाटणा येथील काली घाटावर भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘सपने सुहाने लडकपन के’ मालिकेत काम करत होती… असा दावा वृद्ध महिला करत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर, वृद्ध महिलेने केलेल्या वक्तव्यामुळे तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. वृद्ध महिलेने स्वतःची ओळख पूर्णिमा देवी आहे असं सांगितलं आहे. वृद्ध महिला दार्जिलिंगमध्ये राहायची.. एका व्यक्तीने वृद्ध महिलेला विचारलं की, ‘दार्जिलिंगमध्ये तुमचं घर आहे, तर पाटणामध्ये तुम्ही कशा आल्या’ यावर वृद्ध महिला म्हणाली, ‘माझी मुलं माझा सांभाळ करत नाहीत, ते मला विसरले आहे.. कृपया मला कोणतेही प्रश्न विचारु नका…’ असं देखील ती वृद्ध महिली प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला म्हणाली.
पुढे महिलेला तिच्या मुलीबद्दल प्रश्न विचारल्यास ती म्हणाली, ‘मी सपने सुहाने लडकपन के’ मालिकेत काम करत होती. मी मुंबईमध्ये राहायची…’ असं सांगत असताना वृद्ध महिलेच्या डोळ्यात पाणी आलं. वृद्ध महिलेच्या मुलांनी तिला पाटणाा याठिकाणी सोडले होतं, परंतु ती आधी कोठे राहत होती किंवा तिची मुलं कोण आहेत, हे अद्याप कळू शेकलेलं नाही. दार्जिलिंगमध्ये तिचं घर कुठे आहे… याबद्दल देखील माहिती मिळू शकलेली नाही.
सध्या ज्या वृद्ध महिलेची चर्चा आहे, ती मालिकेत कोणती भूमिका साकारली होती हे देखील कळू शकलेलं नाही. वृद्ध महिलेने फक्त ११ वर्षांपूर्वी भूमिका साकारली होती… एवढीच माहिती समोर येत आहे.. सध्या सर्वत्र ‘सपने सुहाने लडकपन के’ मालिकेत काम करत होती… असा दावा करणाऱ्या वृद्ध महिलाची चर्चा रंगत आहे.
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘सपने सुहाने लडकपन के’ या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपल त्यागी आणि अभिनेत्री महिमा मकवाना मुख्य भूमिकेत होत्या. मालिकेने चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, चाहत्यांनी देखील मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना भरभरुन प्रेम दिलं. मालिकेतील गुंजन ही भूमिका साकारणाऱ्या रुपल त्यागी हिला चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं.
पण सध्या रुपल त्यागी झगमगत्या विश्वापासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रुपल त्यागी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.