Olympics 2024 विनेश फोगटने रचला इतिहास, चाहत्यांची आमिर खानकडे मोठी मागणी

| Updated on: Aug 07, 2024 | 10:55 AM

Olympics 2024: आमिर खान साठी हिच योग्य वेळ आहे..., पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटने इतिहास रचल्यानंतर चाहत्यांचा आमिर खान याच्याकडे मोठी मागणी..., सोशल मीडियावर सर्वत्र विनेश फोगटची चर्चा...

Olympics 2024 विनेश फोगटने रचला इतिहास, चाहत्यांची आमिर खानकडे मोठी मागणी
Follow us on

Vinesh Phogat in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. विनेश फोगाटने संपूर्ण देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होण्याचा मान विनेश फोगाटने मिळवला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत विनेशने मंगळवारी क्यूबाच्या पॅन अमेरिकन विजेत्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा एकतर्फी लढतीत गुणांवर 5-0 असा पराभव केला. विनेशच्या विजयानंतर सोशल मीडियावर #दंगल ट्रेंड करत आहे. आता विनेश बुधवारी होणाऱ्या फायनलमध्ये यूएसएच्या सारा एन हिच्यासोबत भिडणार आहे.

विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजयाचा झेंडा फडकवल्यानंतर चाहत्यांनी अभिनेता आमिर खान याच्याकडे मोठी मागणी केली आहे. ‘दंगल’ सिनेमाचा दुसरा पार्ट बनवण्यासाठी चाहत्यांनी आमिरकडे मागणी केली आहे. विनेशच्या विजयानंतर सोशल मीडियावर तिच्या पूर्ण प्रवासावर सिनेमाची मागणी जोर धरत आहे.

एका यूजरने रिओ 2016, टोकियो 2020 आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिकचा एका कोलाज शेअर करत ‘दंगल 2’साठी हिच योग्य वेळ आहे… असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘हिच योग्य वेळ आहे आमिर खान याने विनेश फोगट हिच्यासोबत लीड रोलमध्ये ‘दंगल 2′ सिनेमा केला पाहिजे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विनेश फोगाट हिच्या विजयाची चर्चा रंगली आहे.

 

 

सांगायचं झालं तर, जेव्हा आमिर खान स्टारर ‘दंगल’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला, तेव्हा फोगाट बहिणींचा संघर्ष आणि मेहनत जगासमोर आली. ‘दंगल’ सिनेमाने अनेक रेकॉर्ड देखील ब्रेक केले. आजपर्यंत कोणताच सिनेमा ‘दंगल’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकलेला नाही. जगभरात सिनेमाने 2000 कोटी रुपयांपेक्षा देखील अधिक कमाई केली.

सिनेमा आमिर खान याने महावीर सिंग फोगट या हौशी कुस्तीपटूची भूमिका साकारली, जो आपल्या मुली गीता फोगट आणि बबिता फोगट यांना कुस्तीपटू बनवण्यासाठी प्रचंड मेहनत आणि मुलींसाठी मोठा संघर्ष करताना दिसला. सिनेमाला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

‘दंगल’ सिनेमात सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी फोगट बहिणींची भूमिका साकारली. तर झायरा वसीव, सुहानी भटनागर आणि साक्षी तन्वर यांनी देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली. सिनेमात आमिर याचं देखील जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन चाहत्यांना पाहायला मिळाला.