Adipurush: ओम राऊतने ‘तान्हाजी’नंतर जे मिळवलं ते ‘आदिपुरुष’मुळे गमावणार?

| Updated on: Oct 03, 2022 | 7:48 PM

रामायणासारखा विषय हाताळताना केली घाई? नेटकऱ्यांचा सल्ला ओम राऊत ऐकणार का?

Adipurush: ओम राऊतने तान्हाजीनंतर जे मिळवलं ते आदिपुरुषमुळे गमावणार?
नेटकऱ्यांचा सल्ला ओम राऊत ऐकणार का?
Image Credit source: Instagram
Follow us on

ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ (Tanhaji) हा चित्रपट म्हणजे उत्तम कामगिरीचा एक नमुना मानला जातो. ऐतिहासिक कथा हाताळताना त्यातल्या कोणत्याही भूमिकेला धक्का न पोहोचवता अचूक मांडणी या चित्रपटातून करण्यात आली. तान्हाजी मालुसरे यांची कामगिरी पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरश: काटा आला. या चित्रपटानंतर ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ची (Adipurush) चर्चा सुरू झाली. रामायण या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या साहजिकच खूप अपेक्षा होत्या. मात्र जेव्हा त्याचा टीझर प्रदर्शित झाला, तेव्हा अनेकांची निराशा झाली.

‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास हा राम, सैफ अली खान हा रावण, क्रिती सॉनन ही सीता आणि देवदत्त नागे हा हनुमानाच्या भूमिकेत आहे. जवळपास पावणे दोन मिनिटांच्या या टीझरमधल्या अनेक गोष्टी नेटकऱ्यांना खटकल्या. त्यातील सर्वांत जास्त खटकणारी बाब म्हणजे रावण म्हणून दाखवलेल्या सैफचा लूक.

हे सुद्धा वाचा

सैफ रावणापेक्षा जास्त खिल्जीसारखा दिसत असल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली. रावणाकडे पुष्पक विमान होतं वटवाघूळ नाही, त्याची लंका सोन्याची होती कोळशाची नाही असे कमेंट्स नेटकरी करत आहेत. एका युजरने तर ओम राऊतला आणखी एक वर्ष घेऊन चित्रपटावर पुन्हा काम करण्याची विनंती केली आहे.

रामायण हा अनेकांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे त्यातील भूमिका, त्यांची वेशभूषा, सेट अशा अनेक गोष्टींशी प्रेक्षक तडजोड करणार नाहीत. कालानुसार जरी कथेच्या मांडणीत बदल केला तरी, त्याची मूळ सुंदरता नष्ट होऊ नये अशी अपेक्षा प्रेक्षकांना असते. यामुळेच याआधी प्रेक्षकांच्या भेटीला आलेले रामायण आणि ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ यांची तुलना होणं स्वाभाविक आहे.