Gadar 2 | भारत-पाकिस्तान संबंध सुधारु शकतात, पण….वाचा Sunny Deol काय म्हणतो?

| Updated on: Jul 27, 2023 | 2:09 PM

Gadar 2 च्या ट्रेलर लाँचच्यावेळी सनी देओलच भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल महत्वाच वक्तव्य. काल या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. Gadar 2 ही फाळणीवर आधारित प्रेमकथा होती.

Gadar 2 | भारत-पाकिस्तान संबंध सुधारु शकतात, पण....वाचा Sunny Deol काय म्हणतो?
Gadar 2 teaser
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. मागच्या अनेक दिवसांपासून या ट्रेलर लाँचची चर्चा होती. चित्रपट रसिकांना सुद्धा ‘गदर 2’ ची प्रतिक्षा आहे. 22 वर्षानंतर तारा सिंह आणि सकीना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. ‘कारगिल विजय दिवसा’च्या निमित्ताने निर्मात्यांनी ‘गदर 2’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. ‘गदर’ चित्रपटात भारत-पाकिस्तान संघर्ष दाखवला होता. फाळणीवर आधारित ही प्रेमकथा होती.

आता ‘गदर 2’ चित्रपटाची कथा सुद्धा त्याच अंगाने जाणारी आहे. या चित्रपटाचा मुख्य नायक सनी देओल स्वत: पंजाब गुरदासपूरमधून खासदार आहे.

भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल सनी देओल काय म्हणाला?

ट्रेलर लाँचच्यावेळी सनी देओलने भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल वक्तव्य केलं. भारत-पाकिस्तानमध्ये द्वेषाच जे वातावरण आहे, त्यासाठी सनी देओलने राजकारणाला जबाबदार धरलं. “मानवतेमध्ये सर्वकाही आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही बाजूला प्रेम आहे. राजकीय खेळामुळे द्वेष निर्माण होतो. चित्रपटातही तुम्हाला तेच पहायला मिळेल. आपण परस्परांशी भांडू नये, अशी लोकांची इच्छा असते” असं सनी देओल म्हणाला.

किती तारखेला प्रदर्शित होणार?

गदर 2 सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेलसोबत उत्कर्षा शर्मा दिसणार आहे. 11 ऑगस्टला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीच्या OMG 2 शी गदरचा सामना असेल.

‘गदर 2’ चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर सोशल मीडियावर हँडपंपबद्दल अनेक मजेदार मीम्स व्हायरल झाले. ट्रेलरच्या शेवटी, सनी देओल हँडपंपकडे रागाने पाहताना दिसतो. ट्रेलरमध्ये सनी देओलला हँडपंप मूळापासून उखडताना दाखवलेलं नाही. पण या सीनवर मोठ्या प्रमाणात शिट्टया वाजल्या. टाळ्यांचा कडकडाट झाला. एका पेजने हँडपंपवरुन मीम बनवला आहे.