अभिनेत्री ऐश्वर्या राय बॉलिवूडच्या सर्वात सुंदर आणि उत्तम अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. ऐश्वर्या आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 20 एप्रिल 2007 मध्ये मित्र-परिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सांगायचं झालं तर, ऐश्वर्या – अभिषेक हे कपल बॉलिवूडच्या पॉवर कपलपैकी एक असल्याचं देखील सांगितलं जातं. सिनेमाच्या सेटवर झालेली दोघांची मैत्री अखेर प्रेम आणि त्यानंतर लग्नापर्यंत पोहोचली. ऐश्वर्या देखील पूर्णपणे अभिषेक याच्या प्रेमात होती. पण याची जाणीव अभिनेत्रीला हनीमूनला गेल्यानंतर झाली. एका मुलाखातीत अभिनेत्री याबद्दल खुलासा केला होता.
ऐश्वर्या म्हणाली, हनीमूनसाठी जात असताना अभिनेत्री आणि अभिषेक बोरा बोराच्या विमानात होते. तेव्हा एअर हॉस्टेजने अभिनेत्रीला मिसेस बच्चन म्हणून हाक मारली. तेव्हा अभिनेत्रीला जाणीव झाली की ती विवाहित आहे.
‘आम्ही विमानात होता. तेव्हा अटेंडेंटने ‘वेलकम, मिसेस बच्चन.. म्हणून माझं स्वागत केलं. तेव्हा अभिषेक आणि मी एकमेकांकडे पाहत राहिलो… आमच्या दोघांना देखील हासू आवरत नव्हतं… तेव्हा मला कळलं आता आपण विवाहित आहोत… मी मिसेस बच्चन आहे…’ असं खुद्द ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
ऐश्वर्या राय हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या कायम तिच्या आईसोबत दिसते. ऐश्वर्या देखील कायम लेक आराध्या हिच्याबद्दल बोलताना दिसते. आराध्या सध्या तिचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहे.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या परदेशात शिकण्यासाठी जाणार असल्याच्या चर्चांनीस देखील जोर धरला आहे. पुढच्या शिक्षणासाठी आराध्या लंडन किंवा न्यूयॉर्क याठिकाणी जाऊ शकते. असं सांगण्यात येत आहे. सध्या आराध्या धीरुबाई अंबानी शाळेत शिक्षण घेत आहे. 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या परदेशात जाईल.. असं सांगण्यात येत आहे.
आराध्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्सच्या यादीत आराध्या अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर देखील आराध्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ऐश्वर्या हिची लेक असल्यामुळे आराध्या कायम चर्चेत असते.