अभिनेत्री मुक्ता बर्वेने (Mukta Barve) मागील अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपट आणि नाटक या माध्यमातून आपले दमदार अभिनय कौशल्याद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यानंतर आता मुक्ता आपल्या अभिनयासोबत आपल्या आवाजाच्या जादूनेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कथावर्णन करत ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. काही दिवसांपूर्वी ‘स्टोरीटेल’ (Storytel) मराठीवर तिची ‘Virus -पुणे’ ही एक सीरिज आली होती. आता याचा दुसरा भाग ‘Virus -2 Pune’ घेऊन ती आपल्या भेटीला आली आहे. नुकतीच तिनं याची माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. सध्या मुक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
एका जीवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय. मायरापर्यंत पोचण्यात, तिचा शोध घेण्यात नेहा, दिव्या, सचिन यशस्वी होतील? न भूतो न भविष्यती अशा या संकटातून ते खरंच बाहेर पडतील? नियतीचा हा जीवघेणा खेळ खरंच संपेल? ‘व्हायरस 2 पुणे’ या स्टोरीटेल मराठी वरील ऑडिओ सिरीज विषयीची ही तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. चाहते देखील मुक्ताच्या या नवीन सीरिजबद्दल विशेष उत्साही आहेत.
‘Virus- पुणे’ या मुक्ताच्या सीरिजच्या पहिल्या सिझनला कमाल लोकप्रियता मिळाली होती आणि त्यामुळे दुसऱ्या सीझनची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुक्ताच्या दुसऱ्या सिझनला स्टोरीटेलवर अद्भुत असा प्रतिसाद मिळत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी आलेल्या मुक्ताच्या‘अॅडिक्ट’ या पहिल्या सीरिजलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. यामध्ये डॉ. रक्षा नावाच्या एका महिलेची ती गोष्ट सांगण्यात आली होती. जिच्या आयुष्यात ती अशा एका घटनेला सामोरे जाते त्यानंतर त्याचे तिला व्यसन लागते. मात्र, हे काही ड्रग्ज, अल्कोहोल इत्यादींचे व्यसन नाही. तिच्या या विचित्र व्यसनामुळे तिचे आयुष्य रंजक आणि भयानक वळण घेते.
तीन ते चार वर्षापूर्वी डॅनियल ॲाबर्ग यांनी प्रथम ‘Virus – Stockholm’ स्विडीश भाषेत लिहीली. त्यावेळी ती एक परिपूर्ण Sci-Fi सिरीज होती, पण दोन वर्षांपूर्वी कथेतला काही अंश थेट वास्तवातच आला आणि पहिल्यांदाच Sci-fi genre ची भिती वाटली. त्यामुळे ही सीरिज मराठी भाषेत आली पाहिजे असं ‘स्टोरीटेल मराठी’ला प्रकर्षाने जाणवलं. आठ ते नऊ महिन्याच्या मेहनतीनंतर डिसेंबर २०२२ ला पहिल्यांदा ‘Virus-पुणे’ स्टोरीटेलवर रिलीज झाली. निरंजन मेढेकरयांनी लिलया पेलत आणि मोहिनी वाघेश्वरी यांनी काटेकोरपणे स्क्रिप्टवर काम करून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं लिखाण केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुक्ता बर्वेने दिलेलं नरेशन. मुक्ताच्या आवाजामुळे ही सीरिज आपण ऐकत नसून हे सर्व आपल्या आजूबाजूला घडतंय असं जाणवतं.
‘Virus – Stockholm’ च्या मराठी भावानुवादावर या मूळ कथेचा लेखक डॅनियल भलताच खुश आहे. त्याला मराठीतील हे सादरीकरण प्रचंड आवडलं आहे आणि विशेष म्हणजे मुक्ता बर्वेच्या दमदार आवाजातील चित्तथरारक कथा ऐकून तो तिचा जबरदस्त फॅन झाला आहे.