कधी मिल कामगार म्हणून 700 रुपयांवर काम केले, आज 350 कोटींचा मालक आहे हा अभिनेता

| Updated on: Aug 02, 2024 | 6:54 PM

बॉलिवूड किंवा इतर भाषेतील इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी कधी विचार ही केला नव्हता की, ते सुपरस्टार बनतील. त्यांनी फक्त परिस्थितीसोबत संघर्ष केला, अभिनयात मेहनत घेतली आणि आज करोडो रुपयांचे मालक आहेत. असाच एक सुपरस्टार आहे ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कधी मिल कामगार म्हणून 700 रुपयांवर काम केले, आज 350 कोटींचा मालक आहे हा अभिनेता
Follow us on

अभिनय क्षेत्रात आलेले असे अनेक लोकं आहेत ज्यांना कधीच वाटलं नव्हतं की ते सिनेमामध्ये काम करतील. अनेक जणांकडे तर सिनेमा पाहण्यासाठी त्याचं तिकीट घेण्याची देखील परिस्थिती नव्हती. अनेकांनी रस्त्यावर झोपून दिवस काढलेत. पण तेच लोकं आता बॉलिवूड आणि इतर चित्रपटसृष्टीत स्टार ठरले आहेत. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या लोकांनी आज करोडोंची संपत्ती कमवली आहे. कधीकाळी उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना कमी पैशात मजुरी देखील करावी लागली. काहींनी तर काम केलं नाही तर उपाशी झोपावे लागेल अशी परिस्थिती होती. पण यांनी संघर्ष केला आणि परिस्थितीवर मात करत समाजात चांगली प्रतिष्ठा मिळवली आहे.

आज 350 कोटींचा मालक

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार झाले आहेत जे कधी काळी रेल्वे स्थानकावर झोपले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. जो आज तब्बल ३५० कोटींचा मालक आहे. आम्ही बोलतोय अभिनेता सुर्याबाबत. जे दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत सुपरस्टार आहे. सूर्याचे वडील देखील अभिनय करायचे. नंतर सूर्याच्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. पण त्यांनी कधी विचार देखील केला नसेल की तो आज इतका मोठा सुपरस्टार होईल. सूर्याची परिस्थिती एकेकाळी अशी होती की, त्याला घर चालवण्यासाठी कापड मिलमध्ये काम करावे लागत होते.

फक्त 736 रुपये पगार

सुर्याचा जन्म 23 जुलै 1975 रोजी चेन्नईमध्ये झाला होता. तो तमिळ अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा आहे. सूर्याने कधीच मोठा सुपरस्टाईल होईल असा विचार केला नव्हता. तो क्षेत्रात येण्यास देखील इच्छूक नव्हता. पण परिस्थितीमुळे त्याला अभिनय करावा लागला. आज जरी त्याच्याकडे सर्व सुखसोयी असल्या तरी देखील त्याला एकेकाळी महिन्याला फक्त 736 रुपये पगार मिळायचा. त्यासाठी पण त्याला १८ तास काम करावे लागत होते.

अभिनेत्री ज्योतिकाने अभिनेता सुर्यासोबत लग्न केले आहे. या जोडप्याने सात चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट पूवेल्लम केतुप्पर हा होता जो 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता.

18 तास काम

‘द हिंदू’ला सूर्याने एक मुलाखत दिली होती, तेव्हा त्याने सांगितले होते की, माझा पहिला पगार महिन्याला 736 रुपये होता. त्यासाठी दिवसाला मला 18 तास काम करावे लागत होते. एका कापड कारखान्यात काम करत असताना त्याने हे कधीच उघड केले नाही की तो अभिनेता शिवकुमार यांचा मुलगा आहे. सूर्याने 8 महिने असेच काम केले.

लवकरत प्रदर्शित होणार नवा सिनेमा

आज सुर्या हा  दक्षिणेतील फिल्म इंडस्ट्रीतील मोठा स्टार आहे. त्याला पाहण्यासाठी लोकं गर्दी करतात. आज त्याची गणना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये केली जाते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सूर्या हा आता 350 कोटींचा मालक आहे. 23 वर्षापासून तो या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. त्याने 1997 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. लवकरच त्याचा कांगुवा हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.