मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एक नाव तूफान चर्चेत आहे, ते म्हणजे ओरहान अवात्रामणि ऊर्फ ओरी. ओरी याचे सोशल मीडियावर सतत फोटो व्हायरल होतात. ओरी हा असा व्यक्ती आहे, ज्याचे नीता अंबानी यांच्यापासून ते बाॅलिवूडच्या जवळपास प्रत्येक अभिनेत्रीसोबत अत्यंत क्लोज असे फोटो आहेत. विशेष म्हणजे ओरी हा प्रत्येक पार्टीमध्ये सहभागी असतो. यामुळेच अनेकांना प्रश्न पडलाय की, अखेर हा ओरी आहे तरी कोण? प्रत्येक अभिनेत्री याच्यासोबत अत्यंत खास आणि बोल्ड पोझ देऊन फोटो काढताना दिसले. शेवटी हा ओरी आता नुकताच बिग बाॅस 17 मध्ये दाखल झालाय.
सलमान खान याच्यासोबत धमाल करताना ओरी हा बिग बाॅस 17 च्या मंचावर दिसला. थेट सलमान खान यानेच ओरी याला त्याच्या पर्सनल लाईफबद्दल असंख्य प्रश्न केले. विशेष म्हणजे ओरी याच्याकडे कोट्यवधी रूपयांच्या वस्तू आहेत. स्वत: सलमान खान यानेच ओरीची बॅग चेक केली. सलमान खान याने थेट ओरी याला विचारले की, तू नेमके काम काय करतो.
बिग बाॅस 17 च्या घरात ओरी हा दाखल झालाय. घरातील सदस्यांसोबत पार्टी करताना ओरी दिसलाय. मात्र, खरोखरच ओरी हा बिग बाॅस 17 च्या घरात राहणार का?, याबद्दल फार जास्त माहिती ही मिळू शकली नाहीये. रिपोर्टनुसार ओरी हा घरातील सदस्यांसोबत पार्टी करून थेट बाहेर पडणार आहे. अनेक बॅग घेऊन ओरी मंचावर पोहचला होता.
#Orry brings entertainment in the house, Promo #BiggBoss17 pic.twitter.com/7KZ0IEeS2H
— The Khabri (@TheKhabriTweets) November 25, 2023
ओरी हा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यासाठी लाखोंच्या घरात फिस घेत असल्याचा खुलासा करण्यात आलाय. सलमान खान याने ओरी याला विचारले की, तू पार्टीमध्ये किती पैसे घालतो. यावर ओरी म्हणाला की, मी पार्टीमध्ये काहीच पैसे खर्च करत नाही. माझे पैसे बाॅलिवूड स्टार देतात. हे ऐकून सलमान खान हसायला लागतो.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ओरी हा बिग बाॅस 17 च्या घरात गेल्यानंतर घरातील सदस्य आनंदी झाले असून अंकिता लोखंडे ही ओरीला भेटते. यासोबत घरातील सर्वच सदस्यांसोबत धमाल करताना ओरी हा दिसतोय. मात्र, अचानक मला बाथरूमला जायचे असल्याचे सांगून ओरी थेट गायब झाल्याचे देखील व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये बघायला मिळतंय.