जान्हवी कपूर आणि ऑरी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, अभिनेत्री म्हणाली, ‘Miss You’

| Updated on: Nov 27, 2023 | 12:09 PM

Janhvi Kapoor | जान्हवी कपूर आणि ऑरी यांचा व्हिडीओ अनेक दिवसांनंतर समोर, अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड म्हणाला, 'खिलौना बना खलनायक...', सोशल मीडियावर फक्त आणि फक्त जान्हवी कपूर आणि ऑरी यांच्या व्हिडीओची चर्चा...

जान्हवी कपूर आणि ऑरी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, अभिनेत्री म्हणाली, Miss You
Follow us on

मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर जान्हवी हिने फार कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते. आता देखील जान्हवी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री खास मित्र ऑरी याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी आणि ऑरी यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ ऑरी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रदर्शित केला आहे. व्हिडीओमध्ये ऑरी आणि जान्हवी ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील ‘पिंगा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी आणि ऑरी यांच्या डान्स व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

जान्हवी हिच्यासोबत व्हिडीओ पोस्ट करत ऑरी याने कॅप्शनमध्ये, ‘प्रत्येक वेळी मस्ती…’ असं लिहिलं आहे. तर ऑरी याच्या पोस्टवर कमेंट करत जान्हवी हिने ‘Miss You…’ असं लिहिलं आहे. एवंढच नाही तर, जान्हवी हिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याने देखील व्हिडीओवर कमेंट केली आहे.

 

 

‘खिलौना बना खलनायक…’, अशी कमेंट शिखर यांनी ऑरी याच्या पोस्टवर केली आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक दिवसांपासून शिखर आणि जान्हवी यांना अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. दोघे एकमेकांना डेट करत आहेत… अशी चर्चा देखील कायम रंगलेली असते. पण यावर शिखर आणि जान्हवी यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

जान्हवी हिचे आगामी सिनेमे

जान्हवी हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री नुकताच अभिनेता वरुण धवन याच्यासोबत ‘बवाल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. त्यानंतर जान्हवी अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत ‘मिस्टर एन्ड मिसेज माही’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय जान्हवी ‘देवरा’ आणि ‘उलझ’ सिनेमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

जान्हवी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि  व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.