आशियातील दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी – नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत आणि होणारी सून राधिका यांचा दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनचीमोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. 1 जूनपर्यंत दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन सोहळा रंगणार आहे. आलिशान क्रुझमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रुझ इटलीपासून फ्रान्सपर्यंत 4380 किलोमीटरचा प्रवास करेल. यादरम्यान भरपूर पार्ट्या, पदार्थ, पेये, मस्ती आणि धम्माल असेल. बुधवारपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे पहिली झलक समोर आली आहे. ऑरी याने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
सांगायचं झालं तर, युरोप ट्रीपला निघताना ऑरीला मुंबई विमानतळावर पापाराझी कॅमेऱ्यांनी कैद केले. अंबानींच्या या लक्झरी क्रूझ पार्टीची सर्वत्र चर्चा होत असतानाच ऑरीने क्रूझ आणि बीचचे काही फोटो शेअर केले आहे. फोटो पोएटो इटली, सार्डिनिया येथील आहेत. ओरीने त्याच्या बेडरुमची एक झलकही दाखवली आहे.
ऑरीने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो पोस्ट केले आहे. क्रुझच्या खिडकीमधून समुद्राच्या लाटा दिसत आहेत. शिवाय बेडरूमचा फोटो देखील ऑरीने पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये ‘परफेक्ट मॉर्निंग…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी यांनी आयोजिक केलेल्या क्रुझ पार्टीची चर्चा रंगली आहे.
अंबानी अपडेट नावाच्या हँडलवर सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझची किंमत 7 हजार करोड रुपयांपेक्षा देखील अधिक आहे. एवढंच नाहीतर, क्रुझमध्ये 600 पेक्षा अधिक कर्मचारी असणार आहेत. जे पाहूण्यांच्या सेवेसाठी हजर असतील.
अनंत – राधिका यांच्या पहिल्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी देखील जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यात बॉलीवूड सेलिब्रिटी, बिझनेस टायकून आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांचा समावेश होता. आता देखील अंबानी कुटुंबियांच्या पाहुण्यांच्या यादीत 800 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे.
अनंत – राधिका यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी प्री-वेडिंग फंक्शनसाठी गेले आहेत.