लॉस एंजिलिस : 11 मार्च 2024 | “… अँड द ऑस्कर गोज टू” हे शब्द ऐकण्यासाठी प्रत्येक मोठा आणि प्रतिभावान कलाकार आतूर असतो. आपल्या कारकिर्दीत एकदा तरी ऑस्कर पुरस्कार पटकावण्याचं स्वप्न असंख्य कलाकारांचं असतं. त्यापैकी काहींची स्वप्नं आज पूर्ण झालं आहेत. अत्यंत प्रतिष्ठित असा हा ‘ऑस्कर पुरस्कार सोहळा’ कॅलिफोर्नियातील लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. जिम्मी किमेलने या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं आहे. ऑस्कर हा ‘द अकॅडमी अवॉर्ड्स’ म्हणूनही ओळखला जातो. या पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं 96 वं वर्ष आहे. या सोहळ्यात अनेकांचं लक्ष ख्रिस्तोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाकडे लागून होतं. कारण या चित्रपटाला विविध विभागांत एकूण 13 नामांकनं मिळाली होती. तर ग्रेटा गेरविगच्या ‘बार्बी’, ‘पुअर थिंग्स’ आणि ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटांनाही नामांकनं मिळाली होती. ओपनहायमरने सर्वाधिक सात ऑस्कर पुरस्कार पटकावले आहेत.
‘टू किल अ टायगर’ या भारतीय माहितीपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म’ या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. या डॉक्युमेंट्रीची बॉबी वाइन: द पिपल्स प्रेसिडेंट, द इटर्नल मेमरी, फोर डॉटर्स, 20 डेज इन मारियुपॉल या इतरांसोबत टक्कर होती. मात्र भारताला ऑस्कर पुरस्कार मिळू शकला नाही. ट्वेंटी डेज इन मारियुपोल या डॉक्युमेंट्री फिचर फिल्मने भारताला मात दिली.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने पटकावला आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वाधिक 13 नामांकनं मिळाली होती. त्यापैकी 7 पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावे केली आहेत.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार इमा स्टोनने ‘पुअर थिंग्स’ या चित्रपटासाठी पटकावला आहे.
And the Oscar for Best Actress goes to… Emma Stone! #Oscars pic.twitter.com/IbKHKWSiby
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचाही ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ने आपल्या नावे केला आहे. ख्रिस्तोफर नोलनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘ओपनहायमर’ या सर्वाधिक चर्चेतल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या किलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. जगभरात शांततेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने हा पुरस्कार समर्पित केला आहे.
Best Actor in a Leading Role goes to Cillian Murphy! #Oscars pic.twitter.com/4BgQJpd6Ou
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्यासाठी बिली आयलिश आणि फिनियास ओकॉनेल यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ‘बार्बी’ या चित्रपटातील ‘व्हॉट वॉस आय मेड फॉर?’ हा गाण्यासाठी हा पुरस्कार मिळाल आहे.
सर्वोत्कृष्ट म्युझिकचा (ओरिजिनल स्कोअर) ऑस्कर पुरस्कार लुडविग गोरानसनला ‘ओपनहायमर’ या चित्रपटासाठी मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट साऊंडसाठी ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. टार्न विलर्स आणि जॉनी बर्न यांनी हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार ‘द वंडरफूल स्टोरी ऑफ हेनरी शुगर’ला मिळाला आहे. वेन अँडरसन आणि स्टिव्हन रेल्स यांनी हा पुरस्कार पटकावला आहे.
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने आपल्या नावे केला आहे. होयटे वॅन होयटेमाने हा पुरस्कार स्वीकारला आहे.
बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म श्रेणीत भारताचा ऑस्कर हुकला आहे. ट्वेंटी डेज इन मारियुपोल या डॉक्युमेंट्री फिचर फिल्मने हा पुरस्कार पटकावला आहे. या श्रेणीत भारताच्या ‘टू किल अ टायगर’ला नामांकन मिळालं होतं.
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार ‘ट्वेंटी डेज इन मारियुपोल’ला मिळाला आहे. मॅस्टिस्लाव्ह चेरनोव्ह, मिशेल मिझनर आणि राने अरॉन्सन रथ यांनी हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. युक्रेनियन चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वांत पहिला ऑस्कर पुरस्कार आहे. हा पुरस्कार पटकावताना दिग्दर्शकांनी रशिया-युक्रेनच्या युद्धाचा उल्लेख केला. त्याचसोबत त्यांनी रशियाकडे युक्रेनचे स्थानिक, सैनिक आणि ओलीस ठेवलेल्यांची सुटका करण्याची विनंती केली.
Congratulations to ’20 Days in Mariupol’ — this year’s Best Documentary Feature Film! #Oscars pic.twitter.com/y1Qsf7bTpm
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्टफिल्मचा ऑस्कर पुरस्कार ‘द लास्ट रिपेअर शॉप’साठी बेन प्राऊडफुट आणि क्रिस बॉवर्स यांना मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर पुरस्कार जेनिफर लेमने ‘ओपनहायमर’ या चित्रपटासाठी पटकावला आहे.
‘Oppenheimer’ made the final cut! Congratulations on the Oscar for Best Film Editing! #Oscars pic.twitter.com/yXS8B3zYin
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर पुरस्कार ‘गॉडझिला मायनस वन’ या चित्रपटाने पटकावला आहे. ताकाशी यमाझाकी, कियोको शिबुया, मासाकी ताकाहाशी आणि तात्सुजी नोझिमा यांनी हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने पटकावला आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अखेर ‘ओपनहायमर’ने खातं उघडलं आहे.
Congratulations to Robert Downey Jr. on winning Best Supporting Actor for ‘Oppenheimer’! #Oscars pic.twitter.com/fFrgo9SiEn
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्मचा पुरस्कार युनायडेट किंग्डमच्या ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ला मिळाला आहे.
United Kingdom snags that Best International Film Oscar! Congratulations to the cast & crew of ‘The Zone of Interest’! #Oscars pic.twitter.com/0lWZItPoal
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
बेस्ट कॉस्च्युम डिझाइनच्या पुरस्काराची घोषणा करण्यासाठी रेसलर आणि अभिनेता जॉन सिना विवस्त्र स्टेजवर पोहोचला.
Margot Robbie reacting to John Cena at the #Oscars pic.twitter.com/ejeoh0QdFe
— Film Updates (@FilmUpdates) March 11, 2024
‘पुअर थिंग्स’ या चित्रपटाने सलग तिसरा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. ‘बेस्ट कॉस्च्युम डिझाइन’ या श्रेणीत होली वॅडिंग्टनने हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
बेस्ट प्रॉडक्शन डिझाइनचा ऑस्कर पुरस्कारही ‘पुअर थिंग्स’ला मिळाला आहे. या चित्रपटाचा हा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे. या चित्रपटाचं प्रॉडक्शन डिझाइन जेम्स प्राइस आणि शोना हिथने केलं असून सेट डेकोरेशन सुसा मिहालेकचं आहे.
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंगचा ऑस्कर पुरस्कार ‘पुअर थिंग्स’ या चित्रपटाला मिळाला आहे. नाडिया स्टेसी, मार्क कुलियर आणि जॉश वेस्टन यांनी हा पुरस्कार पटकावला आहे.
The Academy Award for Best Hair & Makeup goes to… ‘Poor Things’! #Oscars pic.twitter.com/JmxLsn7YBq
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
‘बेस्ट ॲडाप्टेड स्क्रीनप्ले’ श्रेणीत ‘अमेरिकन फिक्शन’ या चित्रपटाने ऑस्कर आपल्या नावे केला आहे. कॉर्ड जेफरसनने या चित्रपटा स्क्रीनप्ले लिहिला आहे.
बेस्ट ओरिजिनल स्क्रिनप्लेचा ऑस्कर पुरस्कार ‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’ने पटकावला आहे. जस्टीन ट्रेट आणि आर्थर हरारी यांनी या चित्रपटाचा स्क्रिनप्ले लिहिला आहे.
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर फिल्मचा पुरस्कार ‘द बॉय अँड द हेरॉन’ने आपल्या नावे केला आहे. या शर्यतीत ‘एलिमेंटल’, ‘निमोना’, ‘रोबॉट ड्रिम्स’ आणि ‘स्पायडर मॅन: अक्रॉस द स्पायडर वर्स’ हे चित्रपट होते.
‘The Boy and the Heron’ secures the Oscar for Best Animated Feature Film! Congratulations, Hayao Miyazaki and Toshio Suzuki! #Oscars pic.twitter.com/mwoxqfxuO2
— The Academy (@TheAcademy) March 10, 2024
सर्वोत्कृष्ट ‘ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म’चा पुरस्कार ‘वॉर इज ओव्हर! इन्स्पायर्ड बाय द म्युझिक ऑफ जॉन अँड योको’ने पटकावला आहे. या शॉर्ट फिल्मसाठी डेव्ह मुलीन्स आणि ब्रॅड बुकर यांनी पुरस्कार स्वीकारला आहे.
The Oscar for Best Animated Short Film goes to… ‘War Is Over! Inspired by the Music of John & Yoko’! #Oscars pic.twitter.com/NGMnf1PB9b
— The Academy (@TheAcademy) March 10, 2024
डेवाइन जॉय रँडॉल्फने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केला आहे. ‘द होल्डोवर्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूडमधील कलाकार आणि लेखकांच्या संपाचा उल्लेख करण्यात आला आहे. 100 हून अधिक दिवस चाललेल्या या संपाचा उल्लेख सूत्रसंचालक जिमी किमेलने केला.
ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ या चित्रपटातील मुख्य अभिनेता सिलियन मर्फी रेड कार्पेटवर दाखल झाला आहे. या चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, कारण तब्बल 13 नामांकनं चित्रपटाला मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार सिलियन पटकावणार असल्याचा अनेकांना विश्वास आहे.
FUTURE OSCAR WINNER CILLIAN MURPHY pic.twitter.com/d5qdMvA8h9
— tommy shelby apologist (@cilliancore) March 10, 2024
ग्रेटा गेरविग दिग्दर्शित ‘बार्बी’ या चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी अभिनेता रायन गॉसलिंगला नामांकन मिळालं आहे. रायन त्याच्या कुटुंबीयांसह या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आहे. त्याचसोबत तो स्टेजवर परफॉर्मसुद्धा करणार आहे. ‘आय एम जस्ट केन’ या चित्रपटातील गाण्यावर तो परफॉर्म करणार आहे.
Ryan Gosling poses for photos at the #Oscars. https://t.co/qxqSOgif3j pic.twitter.com/DOj47ipKyj
— Variety (@Variety) March 10, 2024
‘पुअर थिंग्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या क्षेणीत नामांकन मिळवलेली अभिनेत्री एमा स्टोनचा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील खास लूक-
Emma Stone poses for photos at the #Oscars. https://t.co/qxqSOgif3j pic.twitter.com/zu0W8Kyae4
— Variety (@Variety) March 10, 2024
96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटला सुरुवात झाली आहे. मोठमोठे कलाकार या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
See the biggest stars arrive for the 96th Academy Awards! #Oscars https://t.co/wmD3aBeRpp
— The Academy (@TheAcademy) March 10, 2024
सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी ज्यांना नामांकनं मिळाली आहेत, ते सर्वजण या पुरस्कार सोहळ्यात विशेष परफॉर्मन्स सादर करणार आहेत. यामध्ये ‘बार्बी’च्या रायन गॉसलिंग, आय एम जस्ट केनसह मार्क रॉन्सन यांचा समावेश आहे. याशिवाय बिली एलीश ‘बार्बी’चं गाणं सादर करणार आहे.
अकॅडमी अवॉर्ड्स म्हणून ओळखला जाणारा ऑस्कर पुरस्कार 1929 पासून देण्यात येतोय. लॉस एंजिलिसमधील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसकडून दरवर्षी 20 हून अधिक श्रेणींमध्ये नामांकनं आणि मतदान करण्यात येतात. यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यांसह इतरही विविध श्रेणींचा समावेश आहे. अकॅडमीच्या सदस्यांकडून या पुरस्कारासाठी मतदान होतं.
ख्रिस्तोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) हा सर्वाधिक 13 नामांकनं मिळाली आहेत. त्यापाठोपाठ ‘पुअर थिंग्स’ला (Poor Things) 11 विविध विभागांत नामांकनं मिळाली आहेत. तर मार्टिन स्कॉर्सेसीच्या ‘किलर ऑफ द फ्लॉवर मून’ला 10 नामांकनं मिळाली आहेत. ग्रेटा गेरविग दिग्दर्शित ‘बार्बी’ या चित्रपटाला 8 विभागांत नामांकनं मिळाली आहेत.
भारतीय प्रेक्षक ऑस्कर पुरस्कार सोहळा सोमवारी 11 मार्च रोजी सकाळी 4 वाजल्यापासून लाइव्ह पाहू शकतात. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सोहळा लाइव्ह पाहता येणार आहे. लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा पार पडत आहे.