मुंबई : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 31 जानेवारी रोजी होणाऱ्या 64वा ग्रॅमी अवॉर्ड्स (Grammy Awards Postponed) सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर असे पाऊल उचलण्यात आले आहे. पुढची परिस्थिती लक्षात घेऊन लवकरच या कार्यक्रमाचे पुन्हा आयोजन करण्यात येणार आहे.
‘द रेकॉर्डिंग अकादमी’ने या प्रकरणाबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता 31 जानेवारीला हा सोहळा आयोजित करण्यात मोठा धोका आहे. शहर आणि राज्य अधिकारी, आरोग्य आणि सुरक्षा तज्ञ, कलाकार समुदाय आणि आमच्या अनेक भागीदारांशी झालेल्या चर्चेनंतर, रेकॉर्डिंग अकादमी आणि CBS ने 64वा ग्रॅमी अवॉर्ड शो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही संगीताची आतापर्यंतची सर्वात मोठी रात्र साजरी करण्यास उत्सुक आहोत. या सोहळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.’
After careful consideration and analysis with city and state officials, health and safety experts, the artist community and our many partners, we have postponed the 64th #GRAMMYs. https://t.co/oMzV1U9Tsc
— Recording Academy / GRAMMYs (@RecordingAcad) January 5, 2022
गेल्या वर्षीही कोरोनामुळे हा सोहळा 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. ग्रॅमी पुरस्कार हा सर्वात मोठा वार्षिक संगीत पुरस्कार सोहळा आहे. दरवर्षी या पुरस्कार वितरणाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये नामवंत कलाकारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे सन्मानित केले जाते.
2021 च्या सुरुवातीच्या मोठ्या पुरस्कारांप्रमाणे, कोरोनाव्हायरसमुळे ग्रॅमी पुरस्कार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी, कॉन्सर्ट स्टेपल्स सेंटरऐवजी लॉस एंजेलिस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोकळ्या मैदानी सेटवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. इतकेच नाही तर सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन वेगवेगळे स्टेज तयार करण्यात आले आणि सेलिब्रिटींच्या बसण्याची जागाही बदलण्यात आली. याशिवाय प्रेक्षकांची आसनक्षमताही कमी झाली होती.
बियॉन्से आणि टेलर स्विफ्टसाठी ही एक मोठी संगीतमय रात्र होती. लाइव्ह परफॉर्मन्समुळे, ग्रॅमी स्वतःला इतर अवॉर्ड शोपेक्षा वेगळे सिद्ध करतो. मात्र, गेल्या वर्षी गर्दीमुळे लाईव्ह परफॉर्मन्सला ब्रेक लागला होता. या दिग्गज गायकांनी रंगमंचावर आपली उपस्थिती लावली होती, पण त्यांच्या सादरीकरणाची गाणी आधीच रेकॉर्ड झाली होती आणि स्टेजवर टेप वाजवल्या गेल्या होत्या.
कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?
नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!